शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
7
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
8
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
9
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
10
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
11
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
12
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
13
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
14
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
15
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
16
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
17
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
18
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
19
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
20
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटा तपास; ‘एनआयए’ सांगलीत

By admin | Updated: July 19, 2015 00:42 IST

शिरोळला छापे : आंतरराष्ट्रीय कनेक्शन नाही

सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने उघडकीस आणलेल्या बनावट नोटा प्रकरणाच्या तपासाची राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) माहिती घेतली आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांपुरताच या प्रकरणाचा तपास मर्यादित आहे. कोणतेही आंतरराष्ट्रीय ‘कनेक्शन’ नसल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला दिली. दरम्यान, फरार असलेल्या तेरवाड (ता. शिरोळ) येथील विशाल चव्हाण याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या आठवड्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने प्रवीण कांबळे, आप्पासाहेब घोरपडे, ऐनुद्दीन ढालाईत, सुभाष पाटील, रमेश घोरपडे, इम्रान ढालाईत, प्रभाकर रावळ, संदीप मुडलगी, दीपक हुडेद व बालाजी निकम या दहाजणांना अटक केली होती. त्यांच्याकडून ३४ लाख ३५ हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. चौकशीतून विशाल चव्हाण याचे नाव निष्पन्न झाले आहे. एकूण अकराजणांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगलीत एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट नोटा जप्त झाल्याने त्याची दखल राष्ट्रीय तपास यंत्रणेने घेतली. संशयितांची नावे, ते कुठे राहतात, त्यांचे आंतरराष्ट्रीय ‘कनेक्शन’ आहे का, याची खात्री करून घेतली आहे. दरम्यान, जप्त केलेल्या नोटा तपासणीसाठी नाशिक येथील छापखान्यात पाठविल्या आहेत. (प्रतिनिधी) चव्हाणकडून पैशांचा पुरवठा बनावट नोटांची छपाई करण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीसह अन्य खर्चासाठी लागणारा पैसा फरार असलेल्या चव्हाणने पुरविल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या शोधासाठी शिरोळ तालुक्यात छापे टाकण्यात आले; पण कुठेच सुगावा लागला नाही. लवकरच त्यास अटक केली जाईल, असे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांनी सांगितले.