शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येपासून परावृत्त करण्यात राज्यातील समुपदेशक यशस्वी, ‘टोल फ्री’वर सर्वाधिक समुपदेशन कोल्हापुरातून 

By संदीप आडनाईक | Updated: September 25, 2024 16:50 IST

मानसिक तणावावर सकारात्मक उपाय

संदीप आडनाईक कोल्हापूर : असंख्य कारणांमुळे मानसिक तणावाखाली असणारे टेली मानसचा टोल फ्री क्रमांक फिरवितात. आकडेवारीनुसार राज्यात सर्वाधिक म्हणजे ६१११ फोन कॉल्सवर कोल्हापूर केंद्राने समुपदेशन केले आहे. कौतुकाची बाब म्हणजे या सर्व कॉल्सला योग्य उत्तरे देऊन त्या व्यक्तींना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे श्रेय त्या त्या जिल्ह्यातील समुपदेशकांनी मिळवलेले आहे. २४ सप्टेंबर रोजी ऑगस्ट अखेर घेतलेल्या आढावा बैठकीत हा सकारात्मक उपाय यशस्वी ठरल्याचे समोर आले आहे.

कर्ज, ताणतणाव, परीक्षेत अपयश, व्यसन, विसराळूपणा, वेडेपणा, चिंता, भीती, वर्तमानातील बदल, वारंवार विचार, संशय येणे, घाबरणे, आत्महत्येचा विचार, उन्माद, लैंगिक समस्या, भास होणे, उदासीनपणा, डोकेदुखी, मतिमंदत्व, स्किझोफ्रेनिया, अंगात येणे, निद्रानाश, अतिनैराश्य, बालवयातील मानसिक समस्या अशा अनेक समस्यांमुळे त्रस्त असलेले लोक या १४४१६ टेली मानस टोल फ्री नंबरवर फोन करतात.

त्यांचे समुपदेशन करण्यात पहिल्या पाच क्रमांकात कोल्हापूर आघाडीवर आहे. पुणे, सांगली, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा त्यापाठोपाठ समावेश आहे. रायगड, मुंबई उपनगर, नंदुरबार, पालघर आणि यवतमाळ हे जिल्हे सर्वात शेवटी आहेत.

टेली मानसवर समुपदेशनकोल्हापूर : ६१११, पुणे : ४९२३, सांगली : ४६३९, मुंबई : ३६५२, छत्रपती संभाजीनगर : २६८०, बीड :२३३६, नाशिक : १८०३, धाराशिव : १७७७, नागपूर : १७२३, जळगाव : १४१३, सातारा : १३४५, जालना : १२९३, अहमदनगर : १२५६, अकोला : १२३०, बुलढाणा : १०६४, ठाणे : १०१६, वाशिम : १००१, चंद्रपूर : ९७५, रत्नागिरी : ९५६, नांदेड : ९१५, अमरावती : ८४०, लातूर : ८१८, हिंगोली : ७६३, धुळे : ७४०, सोलापूर : ७३०, सिंधुदुर्ग : ६००, गोंदिया : ५७४, वर्धा : ५६८, परभणी ५६२, गडचिरोली : ५४१, यवतमाळ ५३८, पालघर : ५१७, नंदुरबार : ५०८, मुंबई उपनगर : ३९९, रायगड : ३८९

केंद्र सरकारने १९८२ मध्ये टेली मानस केंद्राद्वारे समुपदेशनाचा हा कार्यक्रम सुरु केला. आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी धडपडणाऱ्या समुपदेशकांची सकारात्मक बाजू यामुळे पुढे आली आहे. -डॉ. अर्पणा कुलकर्णी, मानसोपचार तज्ज्ञ, सेवा रुग्णालय.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्र