शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कार मालकांना न सोसणारा खर्चाचा झटका --महापुराचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 00:39 IST

अशा वाहनांना येणारा दुरुस्तीचा खर्च आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे अनेकांनी दारातील गाडीच हलविलेली नाही.

ठळक मुद्दे: दुरुस्तीचा किमान ३५ हजार ते १० लाखांपर्यंतचा खर्च; गॅरेजचालकांना मिळेना उसंत

कोल्हापूर : महापुरात दुचाकींसह चारचाकींमध्ये पाणी शिरून लाखोंचा फटका बसला. प्रत्येकाला आपले वाहन लवकर दुरुस्त करून मिळावे, याकरिता गाड्यांच्या रांगांसह चालकमालकांनी गॅरेजसमोर एकच गर्दी केली आहे. दुचाकींच्या तुलनेत कारच्या दुरुस्तीचा झटका न सोसणारा आहे.

शहरासह करवीर, आंबेवाडी, चिखली, शिरोळ, बाजारभोगाव, पन्हाळा तालुका, आदी भागांत पुराचे पाणी शिरले. संसारोपयोगी वस्तूंसह दारातील वाहनेही त्यात बुडून गेली. पुराचे पाणी गाडीच्या चाकांपर्यंत होते, तोपर्यंत अनेकांना त्याचे गांभीर्य कळले नाही. तेच पाणी चाक ओलांडून डॅशबोर्डपर्यंत गेले आणि त्यानंतर टपासह गाडी पूर्णपणे बुडाली. यात अनेकांनी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इंजिनसह इलेक्ट्रॉनिक सर्किटही जळून गेले. त्यामुळे हजारांचा खर्च लाखांत कधी गेला, हे पूरग्रस्त गाडीमालकांना कळलेच नाही.

त्यामुळेअशा चारचाकी शहरातील विविध कंपन्यांच्या वितरकांसोबत खासगी गॅरेजांच्या दारात उभ्या आहेत.यात विमा असलेल्या वाहनधारकांना कमी प्रमाणात खर्च अपेक्षित आहे;तर ज्यांच्या विमाच नाही,अशा वाहनांना येणारा दुरुस्तीचा खर्च आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे अनेकांनी दारातील गाडीच हलविलेली नाही.

सद्य:स्थितीत चारचाकींमध्ये अत्याधुनिक पद्धतीचे (मॅकेट्रॉनिक्स) इंजिन, वायरिंग, आदी असल्यामुळे ते सुटे भाग बदलण्याशिवाय वाहनधारकांकडे पर्यायच उरलेला नाही. प्रत्येक वाहनाच्या प्रकारानुसार खर्चाचे आकडेही वाढत आहेत. कारण एकेका सुट्या भागाची किंमत किमान ७० ते ८० हजारांच्या घरात आहे. सुट्या भागाचे दर हे कारचालकांना अशा पद्धतीने दुरूस्ती निघाल्याने परवडणारे नाही. त्यामुळे असे वाहनधारक हवालदिल झाले आहेत.बाधित झालेले सुटे भाग असेवाहनाचे कंट्रोल युनिट, आयसी सर्किट युनिट, गिअर बॉक्समधील सेन्सर युनिट सर्किट, व्हील बेअरिंग्ज, स्टेअरिंग बेअरिंग, इंजिनमधील लो प्रेशर पंप, हाय प्रेशर पंप, अल्टरनेटर, स्टार्टरसह बेअरिंग्ज, रिमोट युनिट, साउंड सिस्टीम, सेंट्रल लॉक सिस्टीम, कुशन, सीट कव्हर, पेट्रोल इंजिनमध्ये पाणी गेल्यानंतर ते खोलून पुन्हा जोडावे लागते.

डिझेल इंजेक्शन पंप, बॅटरी, स्टार्टर, मॅकेट्रॉनिक्सचे सर्किट बोर्ड असे एक ना अनेक सुटे भाग पुराच्या पाण्यात बाधित झाले आहेत.

सुटे भाग अतिशय महागवाहनाच्या प्रकारानुसार सुट्या भागाच्या किमती असल्याने एकेका भागाची किंमत ७० ते ८० हजार रुपये आहे. अनेक वाहनांमध्ये या भागांची दुरुस्ती होत नाही. त्यामुळे तो भाग बदलण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. प्रत्येक गॅरेजसमोर अशी कित्येक वाहने उभी आहेत.त्यांची दुरुस्ती करायची की नाही अशा संभ्रमावस्थेत वाहनधारक आहेत. त्यामुळे पूरबाधित क्षेत्रात जनजीवन पूर्वपदावर येऊनही अशी वाहने घराच्या दारात अजूनही उभी आहेत. 

कमीत कमी खर्चात अशी पूरबाधित वाहने दुरुस्त करून देण्याचा प्रयत्न शहरातील मेकॅनिक बंधू करीत आहेत. अशा वाहनांकरिता गॅरेजचालक रात्री उशिरापर्यंत काम करीत आहेत. काही भाग दुरुस्त होत नाहीत. त्यामुळे ते बदलण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे खर्च वाढत आहे.- सुधीर महाजन, समन्वयक,कोल्हापूर जिल्हा फोर व्हीलर मेकॅनिकल असोसिएशन 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरcarकार