शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदवाड पालिकेच्या मुख्याधिकाऱ्याचा भ्रष्ट कारभार, घोडागाडीतून सनई वाजवत आणले पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 18:45 IST

या अनोख्या आंदोलनाची शहरात चांगलीच चर्चा रंगली होती.

कुरुंदवाड : येथील पालिका मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या भ्रष्ट कारभाराचे पुरावे चक्क घोडागाडीतून सनई  वाजवत आणण्यात आले. जाधव यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कृती समिती पदाधिकाऱ्यांनी १४३९ पानांचा पुरावा संकलीत करुन वाजत गाजत आणले. या अनोख्या आंदोलनाची शहरात चांगलीच चर्चा रंगली होती.मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या आर्थिक ढपल्याची तपासणी गेल्या दोन दिवसांपासून त्रिसदस्यीय समितीकडून केली जात आहे. समितीने मुख्याधिकारी जाधव यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या सर्वपक्षीय कृती समितीला म्हणणे मांडण्यासाठी आज, गुरुवारी पालिकेत बोलावले होते. यावेळी कृती समिती पदाधिकारी मुख्याधिकारी जाधव यांच्या भ्रष्ट कारभाराचा पुरावा असलेली १४३९ पाने संकलीत करुन घोडागाडीतून सनई  वाजवत आणली. मात्र मुख्याधिकारी जाधव यांच्या विरोधात तक्रार करणारी पालिका सफाई महिला कर्मचारी त्रिमूर्ती वाघेला यांनी तक्रार अर्ज मागे घेतल्याने कृती समिती संतप्त झाली.कागदपत्रांची पुरावे असलेली घोडागाडी शहरातील मुख्य मार्गावरुन वाजत गाजत जाधव यांच्या विरोधात घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला. पालिका चौकात सभा झाल्यानंतर पुरावे असलेली कागदपत्रे चौकशी समितीला देण्यात आली. आंदोलनात शिवसेना शहर प्रमुख बाबासो सावगावे, माजी नगरसेवक राजू आवळे, अभिजित पोवार, सुनिल कुरुंदवाडे, कृती समिती अध्यक्ष अर्शद बागवान आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCorruptionभ्रष्टाचार