शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

भ्रष्टाचारी निवृत्त होत आहेत, कारवाई कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 00:57 IST

‘केएमटी’तील डिझेल घोटाळा, विद्युत विभागातील केंबळे घोटाळा या संदर्भात कारवाई झाली नाही. भ्रष्टाचार करणारे कर्मचारी निवृत्त होऊ लागलेत; परंतु त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय का होत नाही? अजून किती दिवस चौकशीसाठी लावणार आहात? अशी विचारणा राजाराम गायकवाड यांनी केली.

ठळक मुद्देस्थायी सभेत प्रशासनाला सवाल : विविध प्रश्नांवर चर्चा

कोल्हापूर : महापालिकेच्या सेवेत असताना ज्यांनी भ्रष्टाचार केला, असे कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असा सवाल शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत प्रशासनास विचारण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती शारंगधर देशमुख होते.

‘केएमटी’तील डिझेल घोटाळा, विद्युत विभागातील केंबळे घोटाळा या संदर्भात कारवाई झाली नाही. भ्रष्टाचार करणारे कर्मचारी निवृत्त होऊ लागलेत; परंतु त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय का होत नाही? अजून किती दिवस चौकशीसाठी लावणार आहात? अशी विचारणा राजाराम गायकवाड यांनी केली. मात्र, या संदर्भात नेमकी माहिती नसल्यामुळे पुढील सभेला त्याची माहिती देऊ, असे सांगून अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेली.

नंदनवन पार्कमध्ये स्वच्छता होत नाही. महानगरपालिका सुविधा देत नाही. भागात गटार व रस्ता नागरिकांनी स्वत: केला आहे; त्यामुळे नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे ठरविले आहे. याकडे सभापती देशमुख यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. तातडीने नगररचना, आरोग्य, पवडी विभागाकडील अधिकाºयांनी कॉलनीला समक्ष भेट देऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन मतदानावर बहिष्कार टाकणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही सभापतींनी केली.

अमृत योजनेअंतर्गत ठेकेदाराने केलेले काम बरोबर नाही. तातडीने साहित्य उपलब्ध करून रस्ता बुजवून द्या. कंपनीने खुदाई केलेल्या ठिकाणी शहरात कोठेही बेस केला नाही, क्रॉस कनेक्शन पेंडिंग आहेत. एम.जी.पी.चे कामावर नियंत्रण नाही. ठेकेदाराला पाठीशी घालू नका; अन्यथा जीवन प्राधिकरणाच्या दारात येऊन बसतील, असा इशारा सभेत देण्यात आला.सेंट्रल किचनच्या तक्रारी बºयाच आहेत. तपासणी करून त्रुटी आढळल्यास त्यांना ब्लॅकलिस्ट करावे. बचत गटांच्या महिलांकडून काम काढून घेऊन त्यांना रस्त्यांवर आणले आहे. मग ठेकेदारांवर कारवाई का केली जात नाही, अशी विचारणा सचिन पाटील, पूजा नाईकनवरे यांनी केली. ठेकेदाराला नोटिसाकाडून खुलासा घेऊन दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे अधिकाºयांनी सांगितले.एलईडी दिवे : वारंवार बंद काशहरातील एलईडी दिवे वारंवार बंद पडतात, याकडे लक्ष वेधण्यात आले तेव्हा आयुक्त यांनी ठेकेदारांसोबत सोमवारी (दि. ३०) बैठक आहे. त्यांना सूचना देण्यात येतील, असे सांगण्यात आले. यावेळी सविता भालकर, भाग्यश्री शेटके, माधुरी लाड यांनी चर्चेत भाग घेतला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजी