शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मनपा पदाधिकाऱ्याची आरोग्य निरीक्षकास शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 15:22 IST

कोरोना संसर्गाच्या काळात जीव धोक्यात घालून शहर स्वच्छता आणि औषध फवारणीचे काम करणाऱ्या महानगरपालिका आरोग्य कर्मचाऱ्यांवर सर्वत्र पुष्पवृष्टीसह सत्कार केले जात असताना दुसरीकडे मात्र एक नवश्रीमंत पदाधिकाऱ्याने चक्क आरोग्य निरीक्षकास कानशिलात लगावली आणि अश्लील शिवीगाळ केली. हा प्रकार गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता कसबा बावडा येथील भाजी मंडईत घडला.

ठळक मुद्देमनपा पदाधिकाऱ्याची आरोग्य निरीक्षकास शिवीगाळकसबा बावडा भाजी मंडईत घडला प्रकार

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या काळात जीव धोक्यात घालून शहर स्वच्छता आणि औषध फवारणीचे काम करणाऱ्या महानगरपालिका आरोग्य कर्मचाऱ्यांवर सर्वत्र पुष्पवृष्टीसह सत्कार केले जात असताना दुसरीकडे मात्र एक नवश्रीमंत पदाधिकाऱ्याने चक्क आरोग्य निरीक्षकास कानशिलात लगावली आणि अश्लील शिवीगाळ केली. हा प्रकार गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता कसबा बावडा येथील भाजी मंडईत घडला.कसबा बावडा परिसरात असलेल्या भाजी मंडईत काही दिवसांपासून साचून राहिलेला कचरा उठाव करण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी होती. दोन-तीन दिवसांपासून तो आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगत होता; परंतु हे काम कर्मचाऱ्यांद्वारे शक्य नव्हते म्हणून कचरा उठाव करण्यास जेसीबी आणि डंपरची मागणी आरोग्य निरीक्षकाने वर्कशॉपकडे केली होती. त्यानुसार गुरुवारी दुपारी हा सर्व कचरा उठाव करायचे ठरले होते. जेसीबी, डंपर मिळणार होते. त्याची पूर्वसूचना संबंधित पदाधिकाऱ्यास देण्यातही आली होती.परंतु गुरुवारी सकाळी पदाधिकाऱ्याने भाजी मंडईत जमलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आरोग्य निरीक्षकास कचरा का उचलला नाहीस याचा जाब विचारला. त्यावेळी दुपारनंतर उचलला जाईल, असे सांगूनही पदाधिकाऱ्याने ऐकले नाही. चार चौघांत थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

शिव्या देऊ नका असे सांगताच पदाधिकाऱ्याचा पारा आणखी वाढला. सरळ अंगावर धावून जात जोरात कानशिलात हाणली. काहीजण आडवे झाल्याने आरोग्य निरीक्षक थोडक्यात वाचला. अंगावर धावून जाणाऱ्या पदाधिकाऱ्यास अन्य व्यक्तींनी रोखले. आजबाजूचे नागरिकही यावेळी जमले.या प्रकाराचा माहिती आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांना देण्यात आली नंतर या सर्वांनी मिळून घडलेली गोष्ट आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याही कानावर घालण्यात आली. आरोग्य निरीक्षक कसबा बावड्यातील असल्याने त्याने पालकमंत्री सतेज पाटील यांच्या स्वीय साहाय्यकामार्फत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे. शहरात सर्वत्र आरोग्य कर्मचाऱ्यांचे सत्कार होत असताना भर मंडईत आरोग्य निरीक्षकास अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून काय शिकावे, असा प्रश्न विचारला जात आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर