शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Unlock : महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांसाठी हे आहेत नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 16:29 IST

पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन शिथलीकरणाच्या काळात कर्नाटकात येणाऱ्या परराज्यातील प्रवाशांसाठीचे कांही नियम कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केले असून संबंधित प्रवाशांसाठी सेवा सिंधू पोर्टलवर स्वयम नोंदणी सक्तीची असणार आहे.

ठळक मुद्देकर्नाटकात येणाऱ्यांना पाळावे लागणार आता कांही नियममहाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांसाठी हे असणार आहेत नियम

बेळगाव : पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन शिथलीकरणाच्या काळात कर्नाटकात येणाऱ्या परराज्यातील प्रवाशांसाठीचे कांही नियम कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केले असून संबंधित प्रवाशांसाठी सेवा सिंधू पोर्टलवर स्वयम नोंदणी सक्तीची असणार आहे.कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याच्या नियमांनुसार कर्नाटकात प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांची सेवा सिंधू पोर्टलवर स्वयम नोंदणी सक्तीची असेल. यामध्ये प्रवाशाच्या नांव, पत्ता, मोबाईल नंबर आणि अन्य आवश्यक माहितीचा समावेश असेल. यासाठी कोणाच्याही मान्यतेची गरज नाही. एकच मोबाईल क्रमांक कौटुंबिक वगळता अन्य वेगवेगळ्या नोंदणीसाठी (रजिस्ट्रेशन) चालणार नाही. व्यवसायिक/ व्यापारी प्रवाशांनी आपले नांव, मोबाईल क्रमांक व पत्ता ही माहिती देण्याबरोबरच ते कर्नाटकात कोणाला भेटायला आले आहेत? आणि केंव्हा परत जाणार? याचीही माहिती देणे आवश्यक आहे.संक्रमित प्रवाशांनी राज्यातील मुक्कामाच्या ठिकाणाचा पत्ता आणि कर्नाटकातून प्रस्थानाचा मार्ग सूचित करणे गरजेचे आहे. रस्तेमार्गासह हवाई आणि जलमार्गाने राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रवासाची आरोग्य तपासणी केली जाईल, त्याचप्रमाणे कॉरन्टाईन नियमानुसार प्रत्येक प्रवाशाच्या हातावर १४ दिवसांचा होम कॉरन्टाईनचा शिक्का मारला जाईल. आगमनाच्या ठिकाणी प्रवाशांची कोरोना तपासणी केली जाईल. या तपासणीत संबंधित प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याची आयसोलेशनसाठी रवानगी केली जाईल.महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांसाठी सात दिवसांचे इन्स्टिट्यूश्नल कॉरन्टाईन आणि सात दिवसांचे होम कॉरन्टाईन सक्तीचे असेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेले प्रवासी, गर्भवती महिला, १० वर्षाखालील मुले, ६० वर्षावरील वयस्क नागरिक, गंभीर आजारग्रस्त व्यक्ती आणि मानसिक त्रास असलेल्या व्यक्तींना इन्स्टिट्यूश्नल कॉरन्टाईन माफ असणार आहे. मात्र संबंधितांना १४ दिवसाचे होम कॉरन्टाईन असेल.

ज्यांना तातडीच्या कामासाठी कर्नाटकात येऊन परत जायचे असेल त्या प्रवाशांकडे आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोगशाळेचे प्रवासापूर्वी दोन दिवस आधी दिलेले कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. यासह अन्य नियमांचा आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या प्रसिद्धीपत्रकात समावेश आहे. राज्याचे चीफ सेक्रेटरी टी. एम. विजय भास्कर यांच्या स्वाक्षरीने हे पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकkolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकbelgaonबेळगाव