शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : क्वारन्टाईन खोलीत नाग घुसतो तेव्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 17:20 IST

सकाळचे सहा. आजरा तालुक्यातील उत्तूर येथील एका शैक्षणिक संस्थेत क्वारन्टाईन केलेल्या व्यक्तीला त्याच्या खोलीत पहाटे अस्सल नाग दिसल्याने त्याची भीतीने बोबडीच वळली. कसेबसे स्वत:ला सावरत त्याने हा प्रकार इतर खोलीत क्वारन्टाईन केलेल्या इतर व्यक्तींना उठवले. अखेर बोलावण्यात आलेल्या एका सर्पमित्राने या नागाला पकडल्यानंतर साऱ्यांचाच जीव भांड्यात पडला.

ठळक मुद्देक्वारन्टाईन खोलीत नाग घुसतो तेव्हाशाळेच्या खोलीत राहणाऱ्या युवकांची पाचावर धारण

रवींद्र येसादेउतूर/कोल्हापूर : सकाळचे सहा. आजरा तालुक्यातील उत्तूर येथील एका शैक्षणिक संस्थेत क्वारन्टाईन केलेल्या व्यक्तीला त्याच्या खोलीत पहाटे अस्सल नाग दिसल्याने त्याची भीतीने बोबडीच वळली. कसेबसे स्वत:ला सावरत त्याने हा प्रकार इतर खोलीत क्वारन्टाईन केलेल्या इतर व्यक्तींना उठवले. अखेर बोलावण्यात आलेल्या एका सर्पमित्राने या नागाला पकडल्यानंतर साऱ्यांचाच जीव भांड्यात पडला.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरु आहे. त्यामुळे पुणे, मुंबई आणि इतर जिल्ह्यातून आजरा तालुक्यात आलेल्या व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात येते. आजरा तालुक्यातील उत्तूर येथील एका शैक्षणिक संस्थेत बाहेरुन आलेल्या सहाजणांना ठेवण्यात आले आहे. शाळेतील दोन खोल्यांमध्ये हे सहाजण गेल्या चौदा दिवसांपासून राहतात.

या शाळेतील स्वतंत्र खोलीत एकटाच राहत असणाऱ्या या युवकाच्या खोलीत आज सकाळी साडेसहाच्या सुमारास त्याला नागाचे दर्शन झाले. सरपटत चाललेल्या या नागाला पाहून या युवकाची बोबडीच वळली. कारण हा अस्सल नाग होता. त्याने कसेबसे स्वत:ला सावरुन शेजारील खोलीत असलेल्या युवकांना मोठ्याने ओरडून जागे केले.या युवकांनी त्याच्या खोलीत जाऊन त्या नागाला आरडाओरड करून खोलीच्या बाहेर जाऊ दिले. दरम्यान, उत्तूर येथील सर्पमित्राला फोनद्वारे बोलावून घेण्यात आले, त्याने शिथापीने हा नाग पकडेपर्र्यत मात्र या सर्वच युवकांची पाचावर धारण बसली होती.

हा नाग सरपटत एका मोगऱ्याच्या झाडीत लपला. सर्पमित्राने त्याला अखेर पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. या शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात मोठी शेतीवाडी आहे. तेथूनच हा नाग आला असावा, असा अंदाज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरsnakeसाप