शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : परप्रांतीय कामगारांना थांबवा; अन्यथा उद्योग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 16:42 IST

कोल्हापुरातील उद्योगांचे चक्र सुरू झाले असून काहीही करून गावी जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांना थांबवा, अशी विनंती कोल्हापूर जिल्ह्यातील विविध नऊ औद्योगिक संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली.

ठळक मुद्देपरप्रांतीय कामगारांना थांबवा; अन्यथा उद्योग बंद उद्योजकांची भीती : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

कोल्हापूर : कोल्हापुरातील उद्योगांचे चक्र सुरू झाले असून काहीही करून गावी जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांना थांबवा, अशी विनंती कोल्हापूर जिल्ह्यातील विविध नऊ औद्योगिक संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली.

आमदार चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली रणजित शहा, संजय शेटे, गोरख माळी, अतुल पाटील, मंगेश पाटील, प्रदीप व्हरांबळे यांनी निवेदन दिले. निवेदनावर सचिन शिरगावकर, सुुमित चौगुले यांच्याही सह्या आहेत.लॉकडाऊननंतर गेल्या काही दिवसांत उद्योग सुरू झाले आहेत; परंतु विविध अडचणींमुळे ते पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. वाहतुकीची अडचण, कच्च्या मालाचा तुटवडा, महानगरे बंद असल्याने अडचणी येत आहेत.

लॉकडाऊनच्या काळात उद्योजकांनी परप्रांतीय कामगारांच्या राहण्याची, खाण्याची व्यवस्था केली. त्यांना कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता घेतली. त्यांचा पगारही दिला आहे; परंतु शासनाने मोफत रेल्वेची सोय केल्याने परप्रांतीय मजूर गावी जात आहेत.

त्याचा फटका स्थानिक उद्योगांना बसणार आहे. त्यामुळे सुरू झालेले उद्योग बंद पडण्याची भीती आहे. त्यातून उर्वरित कामगारांनाही पगार देणे अशक्य होईल. यासाठी या मजुरांना थांबविणे आवश्यक आहे. त्यामुळे सुरू झालेले उद्योग तरी निदान नियमितपणे सुरू राहतील.मजूर का गेले गावी...१. महाराष्ट्रात कोरोना संसर्ग जास्त असल्याने कुटुंबीयांना वाटणारी भीती.२. लॉकडाऊन वाढला तर पोटाला काय खायचे याची चिंता.३. रेल्वेची मोफत सोय होत आहे तर गावी जाऊन येऊ ही भावना.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर