शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : साधे मास्क, ग्लोजवरच डॉक्टरांचा ‘कोरोना’ंशी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 15:53 IST

कोरोनाच्या लढाईत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. साधे मास्क व ग्लोजवरच त्यांचा लढा सुरू आहे. मागणी करूनही पुरवठा होत नाही. बाजारात मोठ्या प्रमाणावर टंचाई असल्यानेच मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले.

ठळक मुद्देसाधे मास्क, ग्लोजवरच डॉक्टरांचा ‘कोरोना’ंशी लढाप्राथमिक आरोग्य केंद्रातील स्थिती : साधनांची मोठ्या प्रमाणावर टंचाई

कोल्हापूर : कोरोनाच्या लढाईत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. साधे मास्क व ग्लोजवरच त्यांचा लढा सुरू आहे. मागणी करूनही पुरवठा होत नाही. बाजारात मोठ्या प्रमाणावर टंचाई असल्यानेच मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले.जिल्ह्यात ७३ प्राथमिक आरोग्य केंद्र व ४१३ उपकेंद्रे आहेत. एका प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २0 ते २५ गावे आणि जवळपास ३0 हजार लोकसंख्या असते. एका आरोग्य केंद्राला दोन वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक, सेविका, ड्रायव्हर, परिचर असा जवळपास दहाजणांचा स्टाफ असतो.

सध्या कोरोनामुळे होम क्वारंटाईन होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एकेका आरोग्य केंद्राकडे किमान २00 ते ३00 लोक होम क्वारंटाईनचे आहेत. त्यांची रोजची तपासणी व आढावा घेण्यासाठी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. मास्क आणि ग्लोज आले आहेत, पण खूपच हलक्या दर्जाचे आहेत.

मास्कसह अन्य साधनांची प्रचंड टंचाई आहे. शासनाकडून तातडीने येत नसल्याने जिल्हा परिषदेच्या पातळीवरच खरेदी केली जात आहे. साठा उपलब्ध होईल, तसा गरजेनुसार त्याचे वितरण केले जात आहे.डॉ. योगेश साळे,जिल्हा आरोग्य अधिकारी

पीपीकिट केवळ शंभरच उपलब्धशासनाच्या निकषानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये साधा तीन स्तर असलेला मास्क दिला जात आहे. त्याची संख्या पीएचसीनिहाय १५0 ते २00 इतकी आहे. ज्या रुग्णालयात कोरोनासदृश रुग्ण आहेत, अशा ठिकाणी वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी एन ९५ हा मास्क देण्यात आला आहे. ते मास्क केंद्रनिहाय २५ ते ५0 दिले आहेत. त्याची एकूण संख्या ५ हजार इतकी आहे. सध्या केवळ १00 पीपीकिट जिल्हा परिषदेकडे उपलब्ध आहेत. एकेका किटची किंमत ४00 ते ५00 आहे. प्रत्येक तालुक्याला १0 ते १५ किट देण्यासाठी म्हणून आणखी एक हजार किटची मागणी केली आहे.

बाह्यरुग्ण विभाग बंदप्राथमिक आरोग्य केंद्रातील ओपीडी आता पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. फक्तक्वारंटाईन झालेल्या रुग्णांकडेच लक्ष दिले जात आहे. त्यामुळे इतर लहान मोठ्या आजारासाठी जायचे कुणाकडे, असा प्रश्न पीएचसीमध्ये उपचारासाठी जाणाऱ्या गोरगरिबांना पडला आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरkolhapurकोल्हापूर