शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

CoronaVirus Lockdown : किरकोळ भाजीपाल्याच्या दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 15:49 IST

गेली पंधरा-वीस दिवस घाऊक बाजारापेक्षा दुप्पट दराने विक्री केली जाणाऱ्या भाजीपाल्याच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. किलोमागे सरासरी ५ रुपये कमी झाले असून, ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देकिरकोळ भाजीपाल्याच्या दरात घसरणविक्रेत्यांनी किलोमागे ५ रुपये केले कमी : ग्राहकांमधून समाधान

कोल्हापूर : गेली पंधरा-वीस दिवस घाऊक बाजारापेक्षा दुप्पट दराने विक्री केली जाणाऱ्या भाजीपाल्याच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. किलोमागे सरासरी ५ रुपये कमी झाले असून, ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत आहे.‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असून, त्यामुळे नागरिक घरातच आहेत. गेला महिनाभर हाताला काम नसल्याने जगायचे कसं? असा प्रश्न सामान्य माणसांसमोर आहे. त्यामुळे अनेकांचे हात मदतीसाठी पुढे येऊ लागले असताना भाजीपाल्या विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट सुरू आहे.

घाऊक बाजारातील भाज्यांचे दर आणि किरकोळ बाजारातील दरात मोठी तफावत दिसते. अडत (६ टक्के), हमाली, वाहतुकीचा खर्च धरून विक्रेत्यांने आपले मार्जिन किती घ्यायचे, यालाही एक मर्यादा असते. मात्र कोल्हापूर शहरातील विक्रेत्यांकडून जादा मार्जिन ठेवल्याने ग्राहकांची लूट सुरू होती.

याबाबत ‘लोकमत’ने ‘शेतकरी कंगाल, विक्रेते मालामाल’ हा ग्राऊंड रिपोर्ट प्रसिध्द केला होता. त्या दिवसापासून कोल्हापूर शहरातील किरकोळ विक्रेत्यांकडील भाज्यांच्या दरात घसरण झाली असून, किलोमागे सरासरी ५ रुपये कमी झाल्याचे ग्राहकांनीच सांगितले. 

शुक्रवारी घाऊक व किरकोळ बाजारातील भाजीचे प्रतिकिलोचे दर-भाजी घाऊक किरकोळवांगी २५ ४०ढब्बू १५ ३०भेंडी ३० ४०टोमॅटो १० १५गवारी २५ ४०कांदा ९ १६मेथी १५ (पेंढी) २०कोथंबीर १३ २०शेपू ८ १०

लॉकडाऊनच्या काळात जाणीवपूर्वक भाजीची टंचाई भासवत चढ्या दराने विक्री सुरू होती. ‘लोकमत’ने या लूटीवर प्रकाश टाकला आणि दोन दिवसापासून किरकोळ बाजारातील भाज्यांच्या दरात घसरण झाली.-गिरीजा सूर्यवंशी, ग्राहक, उत्तरेश्वर पेठ

भाज्यांच्या दरात एकदमच वाढ झाल्याने आमचे बजेट कोलमडले. विशेष म्हणजे शेतकऱ्यांकडून कमी दराने घ्यायचे आणि आम्हाला चढ्या दराने विकले जाते. दोन्ही घटकांची लूट सुरू असल्याबद्दल ‘लोकमत’ने वृत्त दिल्यानंतर काहीसे दर कमी झाले, ‘लोकमत’चे आभार.- दीपाली प्रभू ,गृहिणी, शिवाजी पेठ 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर