शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
3
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
4
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
5
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
6
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
7
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
8
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
9
'माऊस जगलर' वापरून एकाचवेळी ५ कंपन्यात नोकरी; वर्षात ७ कोटींची कमाई; कसा झाला भांडाफोड?
10
नीरेचा नदीकाठ आक्रोशाने गहिवरला; 36 तासानंतर सापडला आजीसोबत पंढरपूरला निघालेल्या गोविंदाचा मृतदेह
11
“तळीये गावातील दरडग्रस्त कुटुंबियांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे”; अंबादास दानवेंची मागणी
12
Vastu Tips: शुक्रवारी बांबूचे रोप आणा घरी, लक्ष्मी कुबेर येतील दारी; चुकवू नका योग्य दिशा!
13
Sonam Raghuwanshi : "राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनमने बॉयफ्रेंड राजशी केलं लग्न", सासरच्यांचा खळबळजनक आरोप
14
Royal Enfield: रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 'या' धमाकेदार बाईकची विक्री पुन्हा सुरू!
15
अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियाला आणखी एक धक्का! दिल्ली-वॉशिंग्टनला जाणारे विमान वाटेतच रद्द
16
सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्...
17
"माझा एक मित्र लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी वाट्टेल ते करतो..." , कोणाबद्दल बोलतोय प्रियदर्शन जाधव?
18
'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच... 
19
डाबर च्यवनप्राशची बदनामी; रामदेव बाबाच्या पंतजलीला कोर्टाचा दणका! काय दिले आदेश?
20
Gold Silver Price 3 July: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, चांदीही १००० रुपयांपेक्षा अधिक महागली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट

CoronaVirus Lockdown :आरोग्य कर्मचाऱ्याचा नोटांचा हार घालून सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 17:47 IST

कोल्हापूर शहरावर कोरोनाचे संकट आलेले असताना महानगरपालिका प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा जोखीम पत्करून काम करीत आहे. संपूर्ण शहरातील नागरिक घरात ‘लॉकडाऊन’ असून महापालिकेचे कर्मचारी मात्र रस्त्यांवर येऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून महालक्ष्मी व मंगेशकरनगर प्रभागातील नागरिकांनी घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा नोटांचा हार घालून आगळ्या वेगळ्या पध्दतीने गौरव केला.

ठळक मुद्देकोरोना संसर्ग काळातही चांगले कामकोरोना संसर्ग काळातही चांगले काम

कोल्हापूर : शहरावर कोरोनाचे संकट आलेले असताना महानगरपालिका प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा जोखीम पत्करून काम करीत आहे. संपूर्ण शहरातील नागरिक घरात ‘लॉकडाऊन’ असून महापालिकेचे कर्मचारी मात्र रस्त्यांवर येऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून महालक्ष्मी व मंगेशकरनगर प्रभागातील नागरिकांनी घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा नोटांचा हार घालून आगळ्या वेगळ्या पध्दतीने गौरव केला.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि संचारबंदी असताना तसेच सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी जिवाची पर्वा न करता चोवीस तास काम करीत आहेत. यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. यामुळे जनतेमध्ये त्यांच्याबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली आहे.कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल शुक्रवारी कोल्हापुरातील जनतेने घेतली. महालक्ष्मी व मंगेशकर नगर प्रभागातील घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांना शाल देऊन व पुष्पवृष्टी करून सन्मानित करण्यात आले.

प्रभाग क्रमांक ३३ महालक्ष्मी मंदिर येथील संघवी हॉस्पिटल गल्ली येथे दैनंदिन कचरा उठाव करणारे घंटागाडीवरील कर्मचारी मारुती घाटगे यांचा नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून व शाल देऊन सत्कार केला. तर प्रभाग क्रमांक ४४ मंगेशकरनगर येथील दैनंदिन कचरा उठाव करणारे घंटागाडीवरील कर्मचारी रंगराव जयवंत आवळे यांचा तेथील नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून व नोटांचा हार घालून सत्कार केला. नागरिकांकडून झालेल्या या अनोख्या सत्काराने कर्मचारी भारावून गेले.. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर