शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : दहावी व बारावी विद्यार्थ्यांना वाढीव गुणासाठीचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 11:14 IST

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेसाठी सन 2019-20 मध्ये प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या वाढीव गुणासाठीचे प्रस्ताव सादर करण्यास 13 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे माध्‌यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे विभागीय सचिव सुरेश आवारी यांनी सांगितले.

ठळक मुद्देदहावी व बारावी विद्यार्थ्यांना वाढीव गुणासाठीचे प्रस्तावसादर करण्यास 13 मे पर्यंत मुदतवाढ : विभागीय सचिव सुरेश आवारी

कोल्हापूर : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेसाठी सन 2019-20 मध्ये प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या वाढीव गुणासाठीचे प्रस्ताव सादर करण्यास 13 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे माध्‌यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे विभागीय सचिव सुरेश आवारी यांनी सांगितले.कोल्हापूर विभागीय माध्‌यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अखत्यारितील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व क. महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी दहावी व बारावी परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याचे प्रस्ताव सादर करण्याची मुदत 30 एप्रिल पर्यंत होती, तथापि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 21 मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने खेळाडू विद्यार्थ्यांकडून प्रस्ताव सादर करणे शक्य झालेले नाही.

पात्र खेळाडू विाद्यार्थी क्रीडा गुण सवलतीपासून वंचित राहू नये म्हणून संबंधित शाळा, क. महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांना खेळाडू विद्यार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव विहीत नमुन्यात दि. 13 मे पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे सादर करण्यास व संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्राप्त प्रस्तावांची छाननी करून 20 मे पर्यंत संबंधित विभागीय मंडळ कार्यालयास शिफारशीसह सादर करण्यास मुदतवाढ दिलेली आहे.एन.सी.सी. व स्काऊट गाईड मधील विद्यार्थी व शास्त्रीय कला चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे सवलतीचे अतिरिक्त गुण मिळविण्यासाठीचे प्रस्ताव विद्यार्थ्यांनी शाळांकडे 13 मे पर्यंत व माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे दि. 20 मे पर्यंत सादर करायचे आहेत.मार्च 2020 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेस प्रविष्ठ सर्व खेळाडू, एन.सी.सी., स्काऊट गाईड, शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणारे विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य सर्व माध्यमिक शाळा व क. महाविद्यालय यांनी नोंद घेऊन कार्यवाही करावी. कोणताही पात्र विद्यार्थी गुणांच्या सवलतीपासून वंचित राहणार नाही याची सर्व शाळा व क. महाविद्यालय प्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही  आवारी यांनी केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याssc examदहावीkolhapurकोल्हापूर