शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : कोल्हापुरात महिनाअखेरपासून चित्रीकरणाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 16:55 IST

कोल्हापुरात महिनाअखेरपासून चॅनेल्सच्या मालिकांचे चित्रीकरण सुरू करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. शुक्रवारी चित्रनगरीची पाहणी झाल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी परिसराची उर्वरित विकासकामे मार्गी लावण्याच्या सूचना करत १७ तारखेनंतर चित्रीकरणासाठीच्या सर्व मान्यता तातडीने मिळतील, असे आश्वासन दिले.

ठळक मुद्देकोल्हापुरात महिनाअखेरपासून चित्रीकरणाची शक्यता बैठकीत चर्चा : चित्रनगरीची पाहणी

कोल्हापूर : कोल्हापुरात महिनाअखेरपासून चॅनेल्सच्या मालिकांचे चित्रीकरण सुरू करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. शुक्रवारी चित्रनगरीची पाहणी झाल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी परिसराची उर्वरित विकासकामे मार्गी लावण्याच्या सूचना करत १७ तारखेनंतर चित्रीकरणासाठीच्या सर्व मान्यता तातडीने मिळतील, असे आश्वासन दिले.सगळीकडे कोरोनाचे संकट असताना कोल्हापूरची आता ह्यग्रीन झोनह्णच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मुंबई-पुण्यातील चित्रीकरण पुढील तीन-चार महिने सुरू होणार नसल्याने रखडलेल्या मालिकांचे चित्रीकरण कोल्हापुरात करण्यासाठीचे प्रयत्न चित्रपट व्यावसायिकांनी सुरू केले असून पालकमंत्री सतेज पाटील यांनी यात पुढाकार घेतला आहे. याअंतर्गतच शुक्रवारी दुपारी त्यांनी चित्रनगरी परिसराची पाहणी केली.यावेळी मंत्री पाटील म्हणाले, १७ तारखेनंतर ग्रीन व ऑरेंज झोनमधील सर्व व्यवहार सुरू होणार आहेत. त्यामुळे चित्रीकरण सुरू करण्यास हरकत येणार नाही. चित्रीकरणासाठी शासकीय पातळीवर कोणकोणत्या विभागांच्या मान्यता घ्याव्या लागतात याची यादी द्या, या सर्व परवानग्या तातडीने मिळण्यासाठी विशेष व्यक्तीची नियुक्ती करून त्या तातडीने देण्याची व्यवस्था करू. चॅनेल हेड व निर्मात्यांच्याशी पुढील आठवड्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोल्हापुरात चित्रीकरण करण्यासाठी संवाद साधला जाईल.यावेळी कलाकारांनी जयप्रभा स्टुडिओ, शालिनी सिनेटोनसारखे लोकेशन्स चित्रीकरणासाठी मिळावीत, अशी मागणी केली. यावेळी आर्किटेक्ट इंद्रजित नागेशकर, प्रकल्प अधिकारी दिलीप भांदिगरे, अभिनेता आनंद काळे, स्वप्निल राजशेखर, देवेंद्र चौगले, विकास पाटील, रवी गावडे, मिलिंद अष्टेकर, संगीतकार शशांक पोवार यांच्यासह चित्रपट व्यावसायिक उपस्थित होते.चित्रनगरीचे काम मार्गी लावायावेळी मंत्री पाटील यांनी चित्रनगरीचे काम तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. आर्किटेक्ट इंद्रजित नागेशकर यांनी त्यांना दुसऱ्या टप्प्यात २ कोटींचा निधी मिळाला असून त्यातून तीन फ्लोअर करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावर पाटील यांनी स्टुडिओतील किरकोळ दुरूस्त्या, फर्निशिंग स्वच्छतागृह, परिसराची स्वच्छता यांची विशेष घेण्याची सूचना केली. कलाकार व टीमला समजण्यासाठी हायवेसह चित्रनगरीला जोडणाऱ्या रस्त्यांवर डिजीटल बोर्ड लावण्यात येणार आहेत.वाहिन्यांकडून चौकशीकोल्हापुरात चित्रीकरण सुरू होणार याची बातमी कळताच मुंबईतील विविध चॅनेल्स, निर्माते व प्रॉडक्शन कंपन्यांनी चौकशी सुरू केली आहे. याबाबत चौकशी करणारे दूरध्वनी चित्रनगरी व्यवस्थापनाला व चित्रपट व्यावसायिकांना येत आहेत. त्यामुळे येथील चित्रीकरणाची उपलब्ध साधने, चित्रीकरणाच्या टीमला देता येणाऱ्या सोयी-सुविधा या सगळ्यांची यादी बनवून रेडी टू शूटची तयारी करणयात येत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर