शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : धैर्यशील माने यांनी क्वारंटाईनसाठी दिले स्वत:चे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 18:21 IST

निगेटिव्ह अहवालानंतर कऱ्हाड येथून रुकडीत परतलेल्या प्रथमेश लोहार या विद्यार्थ्याला खासदार धैर्यशील माने यांनी क्वारंटाईनसाठी स्वत:चे घर देऊन आपुलकी गृह या कोल्हापुरी पॅटर्नची सुरुवात स्वत:पासून बुधवारी केली. क्वारंटाईनसाठी प्रत्यक्ष कृतीतून स्वत:चे घर देणारे ते देशातील पहिले खासदार असतील.

ठळक मुद्देधैर्यशील माने यांनी क्वारंटाईनसाठी दिले स्वत:चे घरदेशातील पहिले खासदार : आपुलकी गृहाची सुरुवात

कोल्हापूर : निगेटिव्ह अहवालानंतर कऱ्हाड येथून रुकडीत परतलेल्या प्रथमेश लोहार या विद्यार्थ्याला खासदार धैर्यशील माने यांनी क्वारंटाईनसाठी स्वत:चे घर देऊन आपुलकी गृह या कोल्हापुरी पॅटर्नची सुरुवात स्वत:पासून बुधवारी केली. क्वारंटाईनसाठी प्रत्यक्ष कृतीतून स्वत:चे घर देणारे ते देशातील पहिले खासदार असतील.संस्थात्मक अलगीकरण होणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने प्रशासनावर ताण वाढत आहे. त्यावर उपाय म्हणून खासदार माने यांनी गावाच्या सुरक्षिततेसाठी आणि गावाच्या सहकार्यातून नव्या कोल्हापुरी पॅटर्नची संकल्पना मांडली होती. यामध्ये रेड झोनमधून येणाऱ्या व्यक्तीच्या निगेटिव्ह अहवालानंतर त्याची त्याच्याच घरी राहण्याची सोय करायची आणि घरातील सदस्यांनी आपल्या भावकीत, शेजारी जाऊन राहायचे, अशी ही संकल्पना आहे.गृह अलगीकरणाच्या या संकल्पनेला आपुलकी गृहाचे नाव देत या कोल्हापुरी पॅटर्नला रुकडी (ता. हातकणंगले) येथील स्वत:चे घर देऊन खासदार माने यांनी प्रत्यक्षात उतरविले. कऱ्हाड येथील महाविद्यालयात अकरावी, बारावीचे शिक्षण घेणारा प्रथमेश हा काही दिवसांपूर्वी आपल्या गावी रुकडीमध्ये आला.

कोविड केअर सेंटरमध्ये त्याच्या स्रावाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याची खासदार माने यांनी स्वत:च्या घरी राहण्याची सोय केली. या घराच्या दरवाजावर त्यांनी आपुलकी गृह असा फलक लावला आहे. त्यावर विलगीकरण केलेल्या विद्यार्थ्याचे नाव, विलगीकरणाचा कालावधी आणि सामाजिक संदेशाचा उल्लेख आहे.

दरम्यान, खासदार माने यांनी स्वत:चे घर उपलब्ध करून दिल्याने माझ्या मनावरील ताण कमी झाला आहे, अशी भावना प्रथमेश याने व्यक्‍त केली. आपुलकी गृहच्या संकल्पनेची खासदार माने यांनी स्वत:पासून सुरुवात करून इतरांसाठी आदर्श निर्माण केला असल्याची प्रतिक्रिया रुकडीचे सरपंच रफिक कलावंत यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर