शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown :राजस्थान अथवा बिहारसाठी उद्या कोणतीही रेल्वे कोल्हापुरातून निघणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 11:02 IST

राजस्थान तसेच बिहार वा कोणत्याही अन्य जिल्ह्यांसाठी शुक्रवारी कोल्हापुरातून कोणतीही रेल्वे निघणार नाही. समाज माध्यमांवरुन फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.

ठळक मुद्देराजस्थान अथवा बिहारसाठी उद्या कोणतीही रेल्वे कोल्हापुरातून निघणार नाहीअफवांवर विश्वास ठेवू नये ;  जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आवाहन

कोल्हापूर - राजस्थान तसेच बिहार वा कोणत्याही अन्य जिल्ह्यांसाठी शुक्रवारी कोल्हापुरातून कोणतीही रेल्वे निघणार नाही. समाज माध्यमांवरुन फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडाऊनमध्ये कोल्हापुरात अडकलेल्या इतर राज्यातील तसेच इतर जिल्ह्यातील कामगार, प्रवासी यांचे अर्ज जिल्हा प्रशासनाकडे आले आहेत. काही समाज माध्यमातून राजस्थान किंवा इतर राज्यामध्ये जाण्यासाठी रेल्वे सोडण्यात येणार आहे, असा संदेश फिरत आहे. परंतु, राजस्थान किंवा बिहारसाठी कुठलीही रेल्वे कोल्हापुरातून शुक्रवारी सुटणार नाही.

ज्यावेळी रेल्वे प्रशासन आणि संबंधित राज्यातील प्रशासनाची संमती मिळेल त्याचवेळी कोल्हापूर किंवा इतर ठिकाणाहून कामगारांची किंवा प्रवासी यांची रेल्वेतून वाहतूक त्या-त्या जिल्ह्यात केली जाईल.कोणत्या दिवशी किती वाजता रेल्वे जाणार आहे, याविषयी जिल्हा प्रशासनामार्फत अधिकृत जाहीर केले जाईल. तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून या जिल्ह्यातील अडकलेल्या कामगार, प्रवासी यांची माहिती त्या-त्या राज्यातील संबंधित जिल्हा प्रशासनाकडे संमतीसाठी पाठविली आहे.

दोन दिवसात ही संमती येईल. यानंतर रेल्वे, बस तसेच खासगी वाहने यामधून अडकलेल्यांना प्रवासासाठी परवानगी दिली जाईल. त्यामुळे रेल्वे, स्थानक, बस स्थानक तसेच इतर ठिकाणी विनाकारण गर्दी करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु नये, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वेkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी