शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

CoronaVirus Lockdown : बाजार समितीत कोथंबीर झाली उदंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 14:10 IST

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी कोथंबीरची आवक वाढल्याने दरात घसरण झाली. तब्बल २१,५०० पेंढ्यांची आवक झाली. ‘लॉकडाऊन’मुळे उठाव नसल्याने सरासरी दर तीन रुपये पेंढीपर्यंत खाली आला.

ठळक मुद्देबाजार समितीत कोथंबीर झाली उदंड२१,५०० पेंढ्यांची आवक : सरासरी तीन रुपये दर

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी कोथंबीरची आवक वाढल्याने दरात घसरण झाली. तब्बल २१,५०० पेंढ्यांची आवक झाली. ‘लॉकडाऊन’मुळे उठाव नसल्याने सरासरी दर तीन रुपये पेंढीपर्यंत खाली आला.‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गेली बारा दिवस ‘लॉकडाऊन’ आहे. त्याचा परिणाम जनजीवनावर झाला असून, शेतीमाल शिवारातच पडून राहिला आहे. शेतीमाल तोडून आणायचा तर विकायचा कोठे? असा पेच शेतकऱ्यांसमोर आहे. बाजार समितीत शेतीमालाची आवक पूर्वीपेक्षा कितीतरी कमी असली तरी मागणीच नाही.

रविवारी. बाजार समितीत २१,५०० कोथंबीर पेढ्यांची आवक झाली. मात्र, उठाव न झाल्याने दर कोसळला. किमान एक रुपया तर कमाल पाच रुपये दर राहिला. टोमॅटोचीही आवक वाढल्याने दरात घसरण झाली. बाजार समितीत १३६९ कॅरेट आवक झाली. सरासरी साडेसात रुपये दर राहिला.पोकळा, मेथी कडाडलीपोकळा, मेथीची आवक मर्यादित असल्याने दर तेजीत आहेत. घाऊक बाजारात मेथीची पेंढी बारा तर पोकळा अकरा रुपये दर राहिला.कलिंगडची आवक वाढलीफळ मार्केटमध्ये संत्री, द्राक्षे, चिक्कू, सफरचंद व कलिंगडची आवक होती. इतर फळांच्या तुलनेत कलिंगडाची आवक थोडी जादा होती. काळ्या पाटीची लाल भडक कलिंगडे वीस रुपयाला मिळत होती. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर