शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
3
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
6
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
7
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
8
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
9
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
10
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
11
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
12
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
13
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
14
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
15
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
17
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
18
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
19
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
20
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले

CoronaVirus Lockdown : लॉकडाऊनमुळे अडकलेल्यांसाठी एसटीतर्फे सोमवारपासून मोफत बस सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 17:31 IST

लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेले नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी काही अटींवर एसटीतर्फे येत्या सोमवारपासून मोफत बस सेवा सुरु होणार आहे, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली आहे. 

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे अडकलेल्यांसाठी एसटीतर्फे सोमवारपासून मोफत बस सेवापरिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली माहिती

कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेले नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी काही अटींवर एसटीतर्फे येत्या सोमवारपासून मोफत बस सेवा सुरु होणार आहे, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली आहे. ही सुविधा फक्त लॉकडाऊन संपेपर्यंतच असणार आहे.सोशल डिस्टनसिंग नियमानुसार प्रत्येक सीटवर एक प्रवासी यामुळे एका बसमध्ये साधारणपणे 21 ते 22 लोक बसू शकतात. त्यामुळे जर २१-२२ लोकांचा एक ग्रुप तयार झाला, तर त्या ग्रुपने आपल्या ग्रुप लिडरच्या नावासह, सर्वांची नावे, संपूर्ण पत्ता, जिथे जायचे आहे तेथील पत्ता, आधार कार्ड नंबर असा फॉर्म भरून शहरी भागामध्ये पोलीस आयुक्त कार्यालय व ग्रामीण भागामध्ये जिल्हाधिकारी/ तहसीलदारांकडे जमा करावीत.

ज्या जिल्ह्यामध्ये ते जाणार आहेत, त्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आल्यानंतर त्यांना एस. टी. कधी व कोठून जाणार आहे याबद्दलची माहिती कळविण्यात येईल. जे नागरिक वैयक्तिक जाऊ इच्छितात त्यांनी एस. टी. महामंडळाने तयार केलेल्या ऑनलाईन पोर्टलद्वारे नाव नोंदणी करायची आहे. हे पोर्टल सोमवार पासून चालू होईल. ऑनलाईन अर्ज करतेवेळी, आपण सध्या ज्या जिल्ह्यात वास्तव्य करत आहात, त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांची परवानगी जोडणे आवश्यक आहे.

या प्रवासादरम्यान, प्रवाशांनी मास्क घालणे, बस मध्ये चढतेवेळी हात सनिट्झरने स्वच्छ करणारे बंधनकारक आहे. बस निघण्यापूर्वी व पोहचल्यानंतर सॅनिटाईज केली जाईल. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रवासी जाणार आहेत तिथे त्यांची तपासणी करून संस्थात्मक किंवा घरीच विलगीकरण करण्याचे अधिकारी त्या त्या नोडल अधिकारी यांच्याकडे असतील. 

 ही पॉईंट टू पॉईंट सेवा आहे. प्रवासात मध्येच कुठे प्रवासी उतरणार नाही किंवा चढणार नाहीत. लांब पल्याच्या गाड्या कुठेही जेवणासाठी थांबणार नाहीयेत, त्यामुळे आपले अन्नपाणी घरूनच घेऊन यावे, तसेच फक्त सॅनिटाईज केलेली महामंडळाचीच प्रसाधनगृहे वापरली जातील. कंटेनमध्ये झोन मधील नागरिकांना कोणतीही सुविधा उपलब्ध नाही,

ही सुविधा फक्त लॉकडाऊन संपेपर्यंतच असणार आहे. त्यामुळे, योग्य माहिती भरून आपापल्या घरी परत जा, कृपया पोलीस कार्यालयांमध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, बस स्टॅन्ड किंवा रस्त्यावर गर्दी करू नये.- सतेज( बंटी) पाटीलपरिवहन राज्यमंत्री

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर