पाचगाव : आरकेनगर येथील प्रेरणा कुंतीनाथ कल्याणकर (वय १७, रा. तारा कॉलनी, आरकेनगर,पाचगाव, मूळ अकोळ, कर्नाटक) या कॉलेज युवतीने राहत्या घरी शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान आत्महत्या केली.घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहीती अशी की, मूळची कर्नाटक येथील प्रेरणा वडिलांचे छत्र हरपल्याने दोन वर्षांपासून आपल्या आजोळी आजी, आजोबांकडे शिक्षणासाठी राहत होती. इयत्ता अकरावीमध्ये शिकणारी प्रेरणा ही कोल्हापुरातील महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कुल व ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी होती. परंतु लॉकडाऊनच्या काळात सुट्टीमध्ये अकोळ गावी आईकडे जाण्यासाठी तिची धडपड चालू होती.कोगनोळी नाक्यावरून दोन वेळा त्यांना परत कोल्हापूरला पाठवण्यात आले. आईला भेटण्यासाठी ती आतुर झाली होती,परंतु तिकडे जाता येत नसल्याने गेल्या दोन, तीन दिवसांपासून ती निराश झाली. याच नैराश्येतून तिने आत्महत्या केली असावी अशी शक्यता व्यक्त होत आहे. अधिक तपास करवीर पोलीस करत आहेत.
CoronaVirus Lockdown : आरकेनगर येथील कॉलेज युवतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 13:39 IST
आरकेनगर येथील प्रेरणा कुंतीनाथ कल्याणकर (वय १७, रा. तारा कॉलनी, आरकेनगर,पाचगाव, मूळ अकोळ, कर्नाटक) हिने राहत्या घरी शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान आत्महत्या केली.
CoronaVirus Lockdown : आरकेनगर येथील कॉलेज युवतीची आत्महत्या
ठळक मुद्देआरकेनगर येथील कॉलेज युवतीची आत्महत्याआईला भेटण्यासाठी जाता येत नसल्याने नैराश्येतून आत्महत्या केल्याची शक्यता