शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : जिल्ह्यात येण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 18:29 IST

आपल्या नातेवाईकांना व इतर ग्रामस्थांना कोरोनाची लागण होऊ नये, याकरिता पुणे, मुंबईहून येणाऱ्या नागरिकांनी जिल्ह्यात येण्यापूर्वी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची परवानगी घ्यावी. हा निर्णय दक्षतेपोटी घेतला असून, त्यास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी केले.

ठळक मुद्देजिल्ह्यात येण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यकहा निर्णय दक्षतेपोटी, सहकार्य करा

कोल्हापूर : आपल्या नातेवाईकांना व इतर ग्रामस्थांना कोरोनाची लागण होऊ नये, याकरिता पुणे, मुंबईहून येणाऱ्या नागरिकांनी जिल्ह्यात येण्यापूर्वी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची परवानगी घ्यावी. हा निर्णय दक्षतेपोटी घेतला असून, त्यास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी केले.

गेल्या चार दिवसांत पुण्या-मुंबईहून कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांचा लोंढा सुरू आहे. त्यांच्यामुळे रुग्णांची संख्या वाढू लागल्याची भावना बळावू लागल्याने त्याला आवर घालण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.पालकमंत्री पाटील म्हणाले, गेले दोन महिने जिल्ह्यावासीयांचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्याचे काम प्रशासनाने केले आहे. एक मे पासून जिल्ह्यात पाच हजार गाड्या मुंबई-पुणे येथून आल्या आहेत. वैद्यकीय पास घेऊन किमान १५ ते २० हजार व्यक्ती आल्या आहेत. या सर्वांचा स्राव तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्राव घेण्यासाठी दोन दिवस आणि तपासणी अहवाल येण्यासाठी दोन दिवस लागतात. यापूर्वीच्या व्यक्तींचा अहवाल येईपर्यंत काही दिवस आपण थांबावे आणि गरज असेल तर पुढील पाच सहा दिवसांनी यावे. जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून संबंधित जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्याशी बोलून त्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.

जे नागरिक मुंबई, पुण्याहून येतील ते आप्त स्वकियांसह ग्रामस्थांना भेटणार आहेत. त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला. बाहेरून येणाऱ्यांनी प्रशासनाला समजून घ्यावे व सहकार्य करावे.- सतेज पाटीलपालकमंत्री कोल्हापूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारीSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील