शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : लाकडात साकारली अंबाबाईची अप्रतिम मूर्ती..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 14:19 IST

शेंद्री (ता. गडहिंग्लज) येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील तरूण कारागीर कपिल सुतार याने लाकडावरील कलाकुसरीतून अनेक शोभेच्या वस्तू तयार केल्या आहेत. त्यातील करवीर निवासीनी अंबाबाईची मूर्ती तर अप्रतिम आहे. लॉकडाऊनच्या काळातील त्याच्या कलाकुसरीचे विशेष कौतुक होत आहे.

ठळक मुद्देलाकडात साकारली अंबाबाईची अप्रतिम मूर्ती..!शेंद्रीच्या कपिलने साकारल्या शोभेच्या विविध वस्तू

राम मगदूम 

गडहिंग्लज (कोल्हापूर)  : शेंद्री (ता. गडहिंग्लज) येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील तरूण कारागीर कपिल सुतार याने लाकडावरील कलाकुसरीतून अनेक शोभेच्या वस्तू तयार केल्या आहेत. त्यातील करवीर निवासीनी अंबाबाईची मूर्ती तर अप्रतिम आहे. लॉकडाऊनच्या काळातील त्याच्या कलाकुसरीचे विशेष कौतुक होत आहे.वडरगे (ता. गडहिंग्लज) येथील सर्व सामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला. लहानपणीच त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्याचे कुटूंब आजोळी शेंद्रीत वास्तव्याला आले. त्याचे मामा पांडूरंग विष्णू लोहार यांचा पारंपरिक व्यवसाय लोहारकीचा. परंतु, काही तरी वेगळे करायचे म्हणूनच तो बारावीनंतर सुतार कामाकडे वळला.गडहिंग्लज परिसरात लाकडी फर्निचर बनविण्याची लहान-सहान कामे करुन तो कुटूंबाला हातभार लावतो. झाडांच्या मुळापासूनही तो अनेक वस्तू बनवितो. त्याला चित्रे काढण्याचाही छंद आहे.७/८ वर्षापूर्वी त्याने पहिल्यांदा गणेशाची लाकडी मूर्ती बनवली. तेंव्हापासूनच त्याला हा छंद जडला. त्यानंतर लॉकडाऊनच्या काळात बाहेरची कामे बंद झाली. त्यामुळे रडत न बसता त्याने वेळेचा सदुपयोग केला. त्यातून त्याच्यात दडलेला हरहुन्नरी कलाकार उजेडात आला.कोरोनाने दिला आत्मविश्र्वास..!मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. आपल्या लग्नापूर्वी स्वत:चे घर बांधण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी हा छंद उपयोगी पडेल, असा आत्मविश्वास ‘कोरोना’च्या संकटातून मिळाला, असे कपिलने आवर्जून सांगितले.‘कपिल’चा कलाविष्कार...!छत्रपती शिवाजी महाराज, साईबाबा, बाळूमामा, अंबाबाई आदी देवदेवतांच्या मूर्तीसह विविध प्रकारची लाकडी हत्यारे, पाळणा, बैलगाडी, होडी, किचन टूल्स यासह अनेक खेळणीदेखील त्याने बनविल्या आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर