शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown :साठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राही, अनुष्का आणि अभिज्ञा पाटीलचा सराव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 17:39 IST

कोल्हापूर : तब्बल साठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोल्हापूरची सुवर्णकन्या आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिने संभाजीनगर रेसकोर्स येथील छत्रपती संभाजीराजे विभागीय ...

ठळक मुद्देसाठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राही, अनुष्का आणि अभिज्ञा पाटीलचा सराव सुरूकोल्हापूरच्या विभागीय संकुलात शूटिंग रेंजवर सरावासाठी पाचजणांना परवानगी

कोल्हापूर : तब्बल साठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोल्हापूरची सुवर्णकन्या आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिने संभाजीनगर रेसकोर्स येथील छत्रपती संभाजीराजे विभागीय क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजवर नेमबाजीच्या सरावास सुरुवात केली. शनिवारी तिच्यासह अनुष्का पाटील आणि अभिज्ञा पाटील या नेमबाजानीही सराव केला.

लॉकडाऊन चार मधील अटी व शर्थीनुसार क्रीडांगणांमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखून ऑलंम्पिकसह विविध आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झालेल्या सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत, अभिज्ञा पाटील, स्वरूप उन्हाळकर, शाहू माने या खेळाडूंनाही सराव करण्यास मुभा देण्यात आली आहे.

त्यानुसार कोल्हापुरातील संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलातील २५ मीटर शूटिंग रेंज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने खुली केली आहे. त्यानुसार सकाळी नेमबाज राही सरनोबत हिने तीन तास या शूटिंग रेंजवर सराव केला. त्यात तिने पॉईट टू टू पिस्तूलमधून सराव केला. या सर्व नेमबाजांकरिता जिल्हा क्रीडा कार्यालयाने रेंज सुसज्ज केली.

लॉकडाऊनच्या काळात घरामध्ये सराव करीत होते. मात्र, स्पर्धेचे वातावरण तयार होण्यासाठी रेंजवर सराव करणे महत्त्वाचे असते. क्रीडा कार्यालयाने सराव करण्यासाठी मुभा दिल्यामुळे आनंद झाला.- राही सरनोबत, आंतरराष्ट्रीय नेमबाज

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याShootingगोळीबारkolhapurकोल्हापूरRahi Sarnobatराही सरनोबत