शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
5
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
6
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
7
Operation Sindoor : जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
9
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
10
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
11
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
12
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
13
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
14
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
15
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
16
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
17
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
18
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
19
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
20
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  

CoronaVirus Lockdown :पहिली ते आठवीच्या निकालाचा प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 15:37 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून शासनाने शाळांना सुट्टी देऊन इयत्ता पहिली ते आठवीची दुसऱ्या सत्रातील परीक्षा रद्द केली. परीक्षा रद्द झाली असली, तरी सत्र दोनचे मूल्यमापन कसे करावे, निकाल कसा तयार करायचा, असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील हा प्रश्न आता आकारिक पद्धतीचा पर्याय निश्चित झाल्याने मार्गी लागला आहे.

ठळक मुद्दे मूल्यमापनासाठी ‘आकारिक’चा पर्याय निश्चित महापालिका, करवीर व कागल पंचायत समितीचे पत्र

कोल्हापर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून शासनाने शाळांना सुट्टी देऊन इयत्ता पहिली ते आठवीची दुसऱ्या सत्रातील परीक्षा रद्द केली. परीक्षा रद्द झाली असली, तरी सत्र दोनचे मूल्यमापन कसे करावे, निकाल कसा तयार करायचा, असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील हा प्रश्न आता आकारिक पद्धतीचा पर्याय निश्चित झाल्याने मार्गी लागला आहे.मूल्यमापन, निकालाबाबत ‘आकारिक’चा पर्याय खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाने शिक्षण विभागाला सूचविला होता. त्यावर दि. २० मार्च रोजी शिक्षण उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार सत्र दोनच्या मूल्यमापनाची कार्यवाही करावी, असे राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी व शिक्षक महासंघ संघटना यांना संदेशाद्वारे कळविले आहे.

या आदेशात इयत्ता पहिली ते आठवीच्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनात वर्षभर चालणाऱ्या आकारिक व साकारिक (संकलित) मूल्यमापनाच्या आधारावर विद्यार्थ्यांना वर्गोन्नती द्यावी, असे म्हटले आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे एका वर्षात सत्र एक आणि दोनमध्ये केले जाते.

सत्र दोनच्या मूल्यमापनासाठी आकारिक मूल्यमापन सर्वच शाळेत पूर्ण असल्याने आकारिक गुणांची शंभर पैकी सरासरी काढून मूल्यमापन करणे हा एकमेव पर्याय शिक्षण विभाग व शिक्षकांना योग्य वाटला. त्यामुळे सन २०१९-२० मधील सत्र दोनच्या मूल्यमापन आणि निकाल तयार करण्यासाठी आकारिक गुणांचा पर्याय निश्चित करण्यात आला आहे. या पद्धतीने निकाल तयार करण्याची सूचना महानगरपालिका, करवीर आणि कागल पंचायत समितीने पत्राद्वारे दिली आहे.

नववी, अकरावीसाठी असा पर्यायइयत्ता नववी, अकरावीतील विद्यार्थ्यांना प्रथम सत्रातील परीक्षेचे गुण तसेच चाचण्या, प्रात्यक्षिके, अंतर्गत मूल्यमापनातील प्राप्त गुणांच्या आधारावर वर्गोन्नती द्यावी. विद्यार्थ्यांना शाळेत न बोलविता निकालाच्या वितरणाचे नियोजन शाळांनी करावे, अशी सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली आहे. 

सत्र दोनचे मूल्यमापन कसे करावे याबाबतचा ‘आकारिक’चा पर्याय महासंघाने सूचविला. ‘लोकमत’ने सविस्तरपणे मांडला. शिक्षण विभागाने त्यावर सकारात्मक कार्यवाही केल्याबद्दल आभार मानतो.-संतोष आयरे, राज्य कार्याध्यक्ष, खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ

आकारिक मूल्यमापनदैनंदिन निरीक्षण, तोंडी काम, प्रात्यक्षिक, प्रयोग, उपक्रम कृती, प्रकल्प, चाचणी परीक्षा यांचा समावेश असणाºया मूल्यमापनाला आकारिक म्हटले जाते. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याexamपरीक्षाkolhapurकोल्हापूर