शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : बोगस पासमुळे राधानगरीतील १८ नागरिकांना नाक्यावरच रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 14:58 IST

ठाण्यापासून को्ल्हापुरात येईपर्यंत महामार्गावर चार ते पाच ठिकाणी पासची तपासणी करण्यात आली. मात्र, किणी नाक्यावर स्कॅन करताना हा पास बोगस असल्याचे कोल्हापूर पोलिसांनी सांगितल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देसर्वजण ठाण्याचे रहिवाशीगाडी मालकाने काढला होता ठाणे पोलीस आयुक्तांचा ई-पास

कोल्हापूर : ठाणे पोलीस आयुक्तांचा पास घेऊन आलेल्या राधानगरी तालुक्यातील १८ नागरिकांना बोगस ई-पास असल्याचे सांगत किणी टोल नाक्यावरच रोखले.

गाडी मालकाने हा पास काढला होता. ठाण्यापासून को्ल्हापुरात येईपर्यंत महामार्गावर चार ते पाच ठिकाणी पासची तपासणी करण्यात आली. मात्र, किणी नाक्यावर स्कॅन करताना हा पास बोगस असल्याचे कोल्हापूर पोलिसांनी सांगितल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.मुंबई, ठाणेसह परिसरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. गेली दोन महिने संपूर्ण देशातील जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वाधिक फटका हा मुंबईसह शेजारील जिल्ह्यांना बसला आहे. त्यामुळे तेथील नागरिक आपल्या मूळ गावी जात असून कोल्हापुरातही मोठ्या प्रमाणात येत आहेत.

पहिल्या टप्प्यात हजारो नागरिक कोल्हापुरात आले. त्यातून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने मध्यंतरी चार-पाच दिवस प्रवेश बंद केले होते. सोमवारपासून पुन्हा प्रवेश सुरू झाल्याने नागरिकांनी ई-पास काढले होते.

राधानगरी तालुक्यातील आकनूर व अर्जुनवाडा येथील १८ जण दोन खासगी गाड्यांतून ठाण्यातून निघाले. प्रवास करणाऱ्या नागरिकांचा ई-पास संबंधित गाडी मालकाने ठाणे पोलीस आयुक्तांलयातून काढला होता. तो त्यांनी ठाण्यापासून कोल्हापूरपर्यंत चार ते पाच ठिकाणी दाखवून पुढील प्रवास केला. मात्र, मंगळवारी सकाळी किणी नाक्यावर आल्यानंतर तो पास ह्यस्कॅनह्ण करण्यात आला आणि पासच बोगस असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर नागरिकांची तारांबळ उडाली.

तुम्ही परत ठाण्याला जावा, असे पोलिसांनी सांगितल्याने संबंधितांनी गाडी मालकाशी बोलून घेतले. दिवसभर हे प्रवासी किणी नाक्यावरच थांबून होते. पास मिळविण्यासाठी त्यांनी निकराचे प्रयत्न केले. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यात यश आले नाही.राजकीय मंडळींचे प्रयत्नपास बोगस असल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर नागरिकांनी राजकीय मंडळींच्या मार्फत प्रयत्न सुरू केले. जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून ई-पासची खातरजमा केली गेली.

गाडी मालकाने पास काढला होता. वाटेत कोठेच अडवले नाही. किणी नाक्यावर आल्यानंतर बोगस असल्याचे सांगितल्याने हादरा बसला.- प्रियांका पाटील (प्रवासी)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtollplazaटोलनाकाkolhapurकोल्हापूरthaneठाणेradhanagari-acराधानगरी