शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनामुळे वस्त्रोद्योगाची चेनही ब्लॉक! बाहेरची बाजारपेठ सुरू नसल्याने अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 06:59 IST

‘कापूस ते कापड ते गारमेंट’ अशा चेनमधील प्रत्येक टप्प्यांवर वेगवेगळ्या अडचणी समोर येत आहेत. त्यातच बाहेरची बाजारपेठ पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने अडचणींमध्ये वाढ होत आहे. परिणामी वस्त्रोद्योगात अद्याप अस्थिरता आहे.

- अतुल आंबीइचलकरंजी (जि.कोल्हापूर) : वस्त्रोद्योगातील सर्व घटक एकमेकाला पूरक असतात. कोरोनाची चेन ब्लॉक करण्याच्या प्रयत्नात वस्त्रोद्योगाची चेनही ब्लॉक झाली आहे. ‘कापूस ते कापड ते गारमेंट’ अशा चेनमधील प्रत्येक टप्प्यांवर वेगवेगळ्या अडचणी समोर येत आहेत. त्यातच बाहेरची बाजारपेठ पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने अडचणींमध्ये वाढ होत आहे. परिणामी वस्त्रोद्योगात अद्याप अस्थिरता आहे.वस्त्रोद्योग सुरू करण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर सूतगिरण्यांपासून सायझिंग, वार्पिंग, विव्हींग (यंत्रमाग), प्रोसेसर्स, गारमेंटपर्यंतच्या चेनमधील सर्व स्थानिक घटकांनी आपापल्या पद्धतीने व्यवसाय सुरू करण्यासाठी धडपड केली. शहरातील व्यावसायिकांकडे उपलब्ध कच्च्या मालावर सध्या कारखाने सुरू आहेत.इचलकरंजीत दक्षिण भारतातील तमिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा तसेच महाराष्टÑ आणि पंजाब, अहमदाबाद (गुजरात) येथून सूत येते. त्यातील काही ठिकाणच्या सूतगिरण्या सुरू झाल्या आहेत. किरकोळ मागणीही आहे. त्यानुसार सूत मिळत आहे; परंतु पुढे मागणी नसल्याने उत्पादन थांबत आहे. शहरात तयार झालेले कापड अहमदाबाद, कोलकाता, दिल्ली, पाली-बालोत्रा, मुंबई, आदी ठिकाणी पाठविले जाते.नवीन संधीचे सोनेरुमाल, नॅपकिन, मास्क, पीपीई किट निर्माण करणारे गारमेंट सुरू आहेत. त्यामुळे त्यासाठी कापड उत्पादन करणारे कारखाने सुरू आहेत. त्यासाठी लागणारे बिम सायझिंग करून घेतले जात आहेत.कामगारांची टंचाईवस्त्रोद्योगातील अनेक घटकांत काम करणारे परप्रांतीय कामगार परत गेल्यानेही काही कारखान्यांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. अडकलेला माल काढून घेण्यासाठीही त्यांना कामगार मिळेनात, अशी परिस्थिती आहे.परराज्यांतील प्रोसेसिंग बंदशहरात तयार होणाऱ्या अनेक चांगल्या क्वॉलिटीचे कापड प्रोसेस करण्यासाठी अहमदाबाद, पाली-बालोत्रा, आदी ठिकाणी परराज्यांत जाते; परंतु तेथील कामकाज ठप्प असल्याने प्रोसेसिंगची प्रक्रिया सध्या बंद आहे.

टॅग्स :Textile Industryवस्त्रोद्योगCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस