शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
2
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
3
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
4
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
5
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
6
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
7
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
8
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
9
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
10
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
11
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
12
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
13
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
14
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
15
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
16
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
17
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
18
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
19
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?

कोरोनाचा कोप; अंत्यसंस्कारावरच पालिकेचे ६४ लाख खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:28 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मार्च २०२० पासून कोरोना संसर्गाचा प्रभाव आणि त्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून, त्याचा अतिरिक्त ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मार्च २०२० पासून कोरोना संसर्गाचा प्रभाव आणि त्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून, त्याचा अतिरिक्त भार महानगरपालिकेच्या तिजोरीवर पडला आहे. मार्च २०२० ते मे २०२१ या चौदा महिन्यांच्या कालावधीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारावर तब्बल ६३ लाख ८८ हजार २०० रुपयांचे खर्च सोसावा लागला. तथापि, संवेदनशील कोल्हापूरकरांच्या मदतीमुळे हा भार देखील हलका झाला.

संपूर्ण देशाला नवीन असणाऱ्या कोरोना विषाणूचा जसा प्रादुर्भाव वाढला, तसा त्याविरुद्ध लढण्याकरिता सर्व विकासकामे बाजूला ठेवून महानगरपालिका प्रशासनाने निधी उपलब्ध करून दिला. त्याच पद्धतीने आजही निधी उपलब्ध करून दिला जात आहे. मर्यादित उत्पन्न असूनदेखील कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने पालिकेच्या स्वनिधीतून निधी उपलब्ध करून देता देता नाकीनऊ आले. परंतु अडचणीत असलेल्या व्यक्तींना अथवा संस्थेला मदत करण्याची कोल्हापूरकरांची भूमिका येथे सत्कारणी आली.

स्मशानभूमीतील शेणी, लाकडे दान करण्याचे आवाहन गतवर्षी तत्कालीन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आणि विद्यमान प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आणि बघता बघता शेणी व लाकडांची रास लागली. त्यामुळे मृतदेहांवरील अंत्यसंस्काराचा आर्थिक भार काही प्रमाणात हलका झाला. विशेष म्हणजे बाजारात शेणी व लाकडे विकत मिळत नसताना ती देणगीच्या स्वरूपात मिळाली.

पॉईंटर -

- जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित - १ लाख २३ हजार ८२१

- कोरोनामुक्त झालेले रुग्ण - १ लाख ०६ हजार ३३३

- सध्या उपचार घेत असलेले - १३ हजार ५३४

- एकूण मृत्यू - ३९५४

-एका अंत्यसंस्काराचा खर्च १८०० रुपये -

एका अंत्यसंस्काराचा खर्च साधारणपणे १८०० रुपयांपर्यंत येतो. महानगरपालिका प्रशासन स्वनिधीतून हा खर्च करीत आहे. प्रत्येक वर्षी अंत्यसंस्कारासाठी अंदाजपत्रकात ३५ लाखांचे बजेट धरले जाते, परंतु त्याहीपेक्षा जास्त खर्च झाला तरी तो निधी उपलब्ध करून दिला जातो. कोल्हापूर महानगरपालिका ही मोफत अंत्यसंस्काराची जनक आहे. एक मृतदेह जाळण्यासाठी ५०० शेणी (गोवऱ्या) व १६० किलाे लाकडे लागतात. सरण रचल्यानंतर पेटलेली शेण कापरावर ठेवून अग्नी दिला जातो.

-पीपीई किटसह पुरेशी खबरदारी-

मृतदेहांवरील अंत्यसंस्कार करण्याचे काम आरोग्य विभागातील अधीक्षक अरविंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली १२ कर्मचारी दिवसरात्र अव्याहतपणे करत आहेत. त्यांना पीपीई किट, हॅन्डग्लोज, साबण, सॅनिटायझर असे प्रतिबंधात्मक साहित्य महापालिका प्रशासनाकडून दिले जाते. गेले वर्षभर काम करत असतानाही स्मशानभूमीतील एकही कर्मचारी कोरोनाबाधित झालेला नाही हे विशेष! सुरुवातीला जिल्हा परिषदेकडून पीपीई किट मिळाले. काहींनी देणगी दाखल दिले. काही महापालिका प्रशासनाने खरेदी केले.

- स्मशानभूमीत झालेले अंत्यसंस्कार-

- मार्च २०२० ते मे २०२१ पर्यंत - १७९२

- मार्च व मे २०२१ पर्यंत- १६५७

- अंत्यसंस्कारासाठी झालेला खर्च - ६३ लाख ८८ हजार २००

कोट -

कोल्हापुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींवर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याने कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह अन्य जिल्ह्यांतील, राज्यांतील व्यक्तींवर देखील येथे अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे नेहमीपेक्षा जादा संख्या दिसते.

अरविंद कांबळे,

स्मशानभूमी अधीक्षक