शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

corona virus : पदाधिकारी पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा परिषद लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 22:05 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेत कायम राबता असणारे पदाधिकारीच कोरोनाबाधित आढळल्याने रविवारी सुट्टी असतानाही अख्खी जिल्हा परिषद हादरली. यातून मुख्य कार्यकारी अधिकारीदेखील सुटले नाहीत. त्यांनी सेल्फ क्वारंटाईन होणे पसंद केले, तर त्यांच्या संपर्कातील अन्य कर्मचारीही स्राव देणे आणि क्वारंटाईन होण्यासाठी धावपळ करू लागले.

ठळक मुद्देमुख्य कार्यकारी अधिकारी सेल्फ क्वारंटाईनसंपर्कातील अधिकारी, कर्मचारी यांचे घेतले स्राव

कोल्हापूर : जिल्हा परिषदेत कायम राबता असणारे पदाधिकारीच कोरोनाबाधित आढळल्याने रविवारी सुट्टी असतानाही अख्खी जिल्हा परिषद हादरली. यातून मुख्य कार्यकारी अधिकारीदेखील सुटले नाहीत. त्यांनी सेल्फ क्वारंटाईन होणे पसंद केले, तर त्यांच्या संपर्कातील अन्य कर्मचारीही स्राव देणे आणि क्वारंटाईन होण्यासाठी धावपळ करू लागले.जिल्हा परिषदेमध्ये दोन नंबरचे पदाधिकारीपद भूषवणाऱ्या या व्यक्तीचा वैयक्तिक संपर्क मोठा आहे. त्यांची अधिकाऱ्यासह ठेकेदार, कार्यकर्ते, सदस्य यांच्याशी ऊठबस जास्त असते. त्यांना गुरुवारी साधारण ताप आणि सर्दी ही लक्षणे जाणवत होती, तरीही ते बैठका घेण्यात व्यस्त होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासोबतही त्यांनी बराच वेळ बैठक घेतली.

इतर अधिकारी, कर्मचारीही त्यांच्यासोबत होते. शुक्रवारी ते जिल्हा परिषदेत आले नाहीत. शनिवारी सुट्टी असल्याने जिल्हा परिषदेमध्ये ते आले नाहीत. मात्र, शनिवारी त्यांनी स्राव तपासणी करता दिला होता. रविवारी दोघे पती, पत्नी बाधित आढळल्याने जिल्हा परिषद हादरली. सामान्य प्रशासन विभागाकडून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू करण्यात आला.पहिल्या टप्प्यात मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी स्वतःला घरीच क्वारंटाईन करून घेतले. पदाधिकारी यांच्या थेट संपर्कातील त्यांचे खासगी सचिव, गाडीचा चालक, शिपाई यांचे स्राव घेण्यात आले, तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही क्वारंटाईन व्हा, असे सांगण्यात आले.सलग तिसरा धक्काजिल्हा परिषदेत मागील आठवड्यात ग्राम सडक योजनेतील महिला कोरोनाबाधित सापडली होती. चार दिवसांपूर्वी जिल्हा परिषद सदस्य बाधित आढळले. त्यांनतर हे पदाधिकारी बाधित आढळल्यानंतर जिल्हा परिषदेला सलग तिसरा धक्का बसला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर