कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेमध्ये इतरांना प्रवेशबंदी केल्याने येथील वर्दळ कमी झाली आहे. केवळ पदाधिकारी आणि निवडक सदस्य जिल्हा परिषदेत आले होते.जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्या, त्याचा जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना झालेला प्रादुर्भाव यांमुळे मंगळवार (दि. ८) पासून येथे अभ्यागतांना प्रवेशबंदी करण्यात आली. पहिल्या दिवशी अनेकांना माहिती नसल्याने येथे आत येण्यासाठी गर्दी केली होती; परंतु कर्मचाऱ्यांनी कडक भूमिका घेत सर्वांना प्रवेश नाकारल्याने आता येथे गर्दी कमी झाली आहे.गुरुवारी अध्यक्ष बजरंग पाटील, शिक्षण सभापती प्रवीण यादव हे पदाधिकारी वगळता फारसे पदाधिकारी नव्हते. काही सदस्य त्यांच्या कामानिमित्त आले होते. मात्र नागरिकांचे येणे बंद झाल्याने गर्दी कमी झाली होती.
corona virus : जिल्हा परिषदेतील वर्दळ थंडावली, इतरांना प्रवेशबंदी केल्याचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 15:54 IST
कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेमध्ये इतरांना प्रवेशबंदी केल्याने येथील वर्दळ कमी झाली आहे. केवळ पदाधिकारी आणि निवडक सदस्य जिल्हा परिषदेत आले होते.
corona virus : जिल्हा परिषदेतील वर्दळ थंडावली, इतरांना प्रवेशबंदी केल्याचा परिणाम
ठळक मुद्देजिल्हा परिषदेतील वर्दळ थंडावलीइतरांना प्रवेशबंदी केल्याचा परिणाम