शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोल्हापूरचा युनिक पॅटर्न, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 11:19 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापुरातील मंत्र्यांनी तसेच पोलीस, आरोग्य, महसूल या प्रशासनांनी युनिक पॅटर्न राबवून प्रभावीपणे काम केले आहे. यामुळे संसर्ग रोखण्यात जिल्हा यशस्वी ठरला असून यापुढेही असेच चांगले काम करा असे गौरवोदगार गृहराज्यमंत्री(ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी केले.

ठळक मुद्दे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून कौतुकमहसूल वाढवण्याच्या सुचना

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापुरातील मंत्र्यांनी तसेच पोलीस, आरोग्य, महसूल या प्रशासनांनी युनिक पॅटर्न राबवून प्रभावीपणे काम केले आहे. यामुळे संसर्ग रोखण्यात जिल्हा यशस्वी ठरला असून यापुढेही असेच चांगले काम करा असे गौरवोदगार गृहराज्यमंत्री(ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी केले.येथील शासकीय विश्रामगृहातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव आदी उपस्थित होते.ते म्हणाले, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही कोरोना रोखण्यासाठी चांगलं प्रभावीपणे काम केले आहे. प्रशासनाने युनिक पॅटर्न राबवून कोरोनाचा संसर्ग रोखला आहे. रात्रंदिवस फिल्डवर राहून परिस्थिती हाताळली आहे. विशेषत: पोलीस, महसूल, आरोग्य यांच्यावर अधिक जबाबदारी होती. जिल्ह्यामध्ये विनापास कोणीही येणार नाही, याची दक्षता घ्या.जिल्हाधिकारी देसाई यांनी यावेळी १८ प्रवेश नाक्यावरून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींच्या संगणक प्रणालीद्वारे तपासणीबाबत तसेच जिल्ह्यातील प्रयोगशाळेत स्वॅब तपासणी अहवालाबाबतही माहिती दिली. पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि कोरोनातील कामकाजाबाबत सादरीकरण केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी कोरोनाबाबतची माहिती दिली. जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, समाज कल्याण आयुक्त बाळासाहेब कामत, उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनीही विभागांची माहिती सादर केली. सांगली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनीही विभागाचा आढावा दिला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याShambhuraj Desaiशंभूराज देसाईkolhapurकोल्हापूर