शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

corona virus : लाल परीला गती; रेल्वे मात्र रुळांवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 17:59 IST

लॉकडाऊननंतर एस. टी.ची लाल परी गती घेऊ लागली असून, दिवसाला कोल्हापूरच्या सर्व आगारांतून १२५ हून अधिक बसेस मुंबई, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, आदी मार्गांवर धावू लागल्या आहेत. प्रवासी वर्गाचाही त्यांना प्रतिसाद वाढू लागला आहे.

ठळक मुद्देलाल परीला गती; रेल्वे मात्र रुळांवरचसर्वाधिक बस पुणे मार्गावर : खासगीला अल्प प्रतिसाद

कोल्हापूर : लॉकडाऊननंतर एस. टी.ची लाल परी गती घेऊ लागली असून, दिवसाला कोल्हापूरच्या सर्व आगारांतून १२५ हून अधिक बसेस मुंबई, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, आदी मार्गांवर धावू लागल्या आहेत. प्रवासी वर्गाचाही त्यांना प्रतिसाद वाढू लागला आहे.एस.टी.च्या कोल्हापुरातील सर्व आगारांतून आंतरजिल्हा, जिल्ह्याअंतर्गत आणि तालुका ते गाव या पातळीवर सुरू झालेल्या बसेसना पहिले काही दिवस अत्यल्प प्रतिसाद लाभला. मात्र, गणेशोत्सवाची धूम जशी सुरू झाली, तशी एस.टी. बसेसच्या चाकांनाही गती मिळू लागली.

५०, १०० आणि आता १२५ हून अधिक बसेस मुंबई, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर या मार्गांवर गेल्या १० दिवसांहून अधिक काळ धावू लागल्या आहेत. या बसेसना प्रवासी वर्गातूनही उदंड़ प्रतिसाद लाभत आहे. वाढता प्रतिसाद पाहून कोल्हापूर आगारानेही मागणीप्रमाणे बसेसची सुविधा देण्यास प्राधान्य दिले आहे.कोल्हापूरच्या छत्रपती शाहू टर्मिनसवरून अद्यापही पुणे, मुंबई किंवा अन्य ठिकाणी जाण्यासाठी पश्चिम रेल्वेने एकही रेल्वेची सोय केलेली नाही; त्यामुळे केवळ पुणे येथून गोवा एक्सप्रेस, पटना एक्सप्रेस, बिहार, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, आदी ठिकाणी जाण्यासाठी दिवाळीनंतरचे आरक्षण कोल्हापूर रेल्वे स्थानकातून केले जात आहे.

विशेष म्हणजे गेल्या महिन्यापासून नऊ लाख रुपयांचा परतावा कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून तिकीट रद्द केलेल्या प्रवाशांना देण्यात आला; तर बुधवारी दुपारपर्यंत १२ जणांनी २० प्रवाशांकरिता राज्याबाहेर जाण्यासाठी रेल्वे आरक्षण केले. त्यातून रेल्वेकडे १९ हजार ८७५ रुपये जमा झाले. हेही आरक्षण दिवाळीनंतरचे झाले आहे.

रेल्वेगाड्या सुरू झाल्यानंतरच रेल्वेला गती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे अद्यापही रुळांवर थबकली आहे.लॉकडाऊननंतर खासगी बसेसनाही प्रवाशांचा म्हणावा तितका प्रतिसाद अजूनही मिळालेला नाही. त्यामुळे कोल्हापुरातून रोज पुणे, मुंबई, सोलापूर या मार्गांवर हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत बसेस रवाना होत आहेत. 

टॅग्स :state transportएसटीkolhapurकोल्हापूर