शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : रुग्णालयापेक्षा घरीच उपचारास प्राधान्य, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 17:28 IST

coronavirus, kolhapurnews गेल्या महिनाभरात जिल्ह्यातील कोरोनाचा प्रभाव झपाट्याने कमी होत असून सद्य:स्थितीत कोरोना रुग्णांनी रुग्णालयात उपचार घेण्यापेक्षा घरीच उपचार घेणे पसंत केले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत सीपीआरसह कोविड रुग्णालयात फक्त ७०१ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तर १४५१ रुग्ण घरीच अलगीकरणात राहून उपचार घेत आहेत.

ठळक मुद्दे रुग्णालयापेक्षा घरीच उपचारास प्राधान्य, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची स्थिती रुग्णालयात ७०१, तर घरी १४५१ रुग्ण

तानाजी पोवारकोल्हापूर : गेल्या महिनाभरात जिल्ह्यातील कोरोनाचा प्रभाव झपाट्याने कमी होत असून सद्य:स्थितीत कोरोना रुग्णांनी रुग्णालयात उपचार घेण्यापेक्षा घरीच उपचार घेणे पसंत केले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत सीपीआरसह कोविड रुग्णालयात फक्त ७०१ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तर १४५१ रुग्ण घरीच अलगीकरणात राहून उपचार घेत आहेत.मार्चअखेरपासून १५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात कोरोनाने कहर केला होता. नागरिकांत दहशत निर्माण झाली; पण गेल्या महिनाभरात कोरोनाचा प्रभाव ओसरतोय, तशी भीतीही कमी होत आहे.जिल्ह्यात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या ४७ हजारांवर पोहोचली. उपचाराअंती सुमारे ४३ हजारांहून अधिक रुग्ण घरी परतले. सध्या जिल्ह्यात फक्त २१५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांपैकी ७०१ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोल्हापूर शहरातील ५७६, नगरपालिका व ग्रामीण हद्दीतील ८७५ अशा एकूण १४५१ रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच अलगीकरणात उपचार घेत आहेत.ग्रामीण भागात घरी अलगीकरणातील रुग्णांवर जिल्हा आरोग्य प्रशासन, तर कोल्हापूर शहरात घरी अलगीकरणातील रुग्णांवर महापालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र, काही खासगी रुग्णालयांतील डॉक्टर नजर ठेवून उपचारांबाबत मार्गदर्शन करीत आहेत. याशिवाय शहरात मंगळवार पेठेतील अहिल्याबाई विद्यालयात शिक्षक वॉर रूममधून घरी अलगीकरणात उपचार घेणाऱ्या कोरोनाग्रस्तांची रोज विचारपूस करून त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.कोविडच्या ४० रुग्णालयांत एकही रुग्ण नाहीकोरोनाचा प्रभाव मोठा होता, त्यावेळी जिल्ह्यातील सुमारे ९६ कोविड रुग्णालयांत कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. अनेक रुग्णांना अक्षरश: बेड मिळाला नसल्याने अनेकांनी जीव सोडल्याची उदाहरणे समोर आहेत. पण सध्या कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता ही कोविडची ४० रुग्णालये ओस पडली आहेत. या रुग्णालयांत सध्या कोरोनाचा एकही रुग्ण उपचारासाठी दाखल नाही.सध्याचे रुग्णालयांतील रुग्ण

  • सीपीआर रुग्णालय - ९०,
  • आयजीएम रुग्णालय (इचलकरंजी)- २२
  • डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय- ५०
  •  
  • कोल्हापूर  जिल्ह्यातील कोरोनाचा प्रभाव पूर्णपणे कमी झाला आहे. गेल्या २४ तासांत दोघांचा मृत्यू झाला; तर ८५ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ४७३७६ वर, तर मृत्युसंख्या १५९६ वर पोहोचली. दिवसभरात ३१९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
  •  

    गेल्या सहा महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने कहर उडविला होता. जिल्ह्यातील लोक अक्षरश: भीतीच्या छायेखाली वावरत होते, तर मृत्यूचेही प्रमाण कमालीचे वाढले होते; पण महिनाभरात कोरोनाचा प्रभाव टप्प्याटप्प्याने कमी होत आता पूर्णपणे उठाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाचा कहर कमी-कमी होत आता काही तालुक्यांत तर दिवसभरात एकही नवा रुग्ण आढळत नाही.

  • गेल्या २४ तासांत अवघ्या ८५ नव्या रुग्णांची भर पडली; तर दोन व्यक्तींचा सीपीआरमध्ये मृत्यू झाल्याची प्रशासनाकडे नोंद झाली आहे. त्यामुळे मृत्यूची संख्या १५९६ वर पोहोचली आहे. एकूण रुग्णसंख्या ४७३७५ च्या वर झाली आहे. आतापर्यंत सुमारे ४३६२८ जणांना डिस्चार्ज दिल्याने सद्य:स्थितीत सुमारे २१५२ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत.

    भुदरगड, गगनबावडा, राधानगरी तालुक्यांत प्रत्येकी एक नवा रुग्ण

    जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव कमी होताना गेल्या २४ तासांत भुदरगड, गगनबावडा, राधानगरी तालुक्यांत प्रत्येकी एका नव्या रुग्णाची वाढ झाली; तर चंदगड तालुक्यात दोन, पन्हाळा तालुक्यात तीन, आजरा व शिरोळ तालुक्यांत प्रत्येकी चार, हातकणंगले व गडहिंग्लज तालुक्यांत प्रत्येकी सात; तर करवीर तालुक्यात आठ व कोल्हापूर शहरात नव्या ३५ रुग्णांची भर पडली.

     

    आंबेवाडीतील रुग्णाचा मृत्यू 

    दिवसभरात सीपीआर रुग्णालयात दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. त्यांपैकी एक ६५ वर्षीय पुरुष करवीर तालुक्यातील आंबेवाडीतील; तर दुसरी ७८ वर्षीय महिला रुग्ण ही सातारा जिल्ह्यातील म्हारूळ हवेली (ता. पाटण) येथील आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोना रुग्णस्थिती...

आजरा- ८३५, भुदरगड- ११८४, चंदगड- ११४३, गडहिंग्लज- १३६०, गगनबावडा- १३४, हातकणंगले- ५१४६, कागल- १६१४, करवीर- ५४७५, पन्हाळा- १८१३, राधानगरी- १२०४, शाहूवाडी- १२६३, शिरोळ- २४२१, नगरपालिका- ७२६८, कोल्हापूर शहर- १४३४८, इतर जिल्हे / राज्य- २१६८.

  • एकूण रुग्णसंख्या : ४७३७६
  • एकूण मृत्यूसंख्या : १५९६
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर