शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

corona virus : जिल्ह्यात कोरोना नवीन रुग्णांचे प्रमाण नऊ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 20:30 IST

coronavirus, muncipaltycarporation, kolhpaurnews कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना महामारीची परिस्थिती कमालीची सुधारली असून, नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ९.४७ टक्क्यांपर्यंत खाली गेले असून कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९२.४६ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यातही आणखी एक समाधानाची बाब अशी की, जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही खूपच कमी झाले आहे. दरम्यान, गुरुवारी जिल्ह्यात ७४ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर तिघांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देजिल्ह्यात कोरोना नवीन रुग्णांचे प्रमाण नऊ टक्क्यांवर७४ नवीन रुग्णांची नोंद : तिघांचा मृत्यू : कोरोनामुक्तांचे प्रमाण ९२.४६ टक्के

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना महामारीची परिस्थिती कमालीची सुधारली असून, नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ९.४७ टक्क्यांपर्यंत खाली गेले असून कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९२.४६ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यातही आणखी एक समाधानाची बाब अशी की, जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही खूपच कमी झाले आहे. दरम्यान, गुरुवारी जिल्ह्यात ७४ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर तिघांचा मृत्यू झाला.जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांत जिल्ह्यात कोरोना महामारीचा प्रचंड उद्रेक झाला होता, त्याच्या तुलनेत आता रुग्णांची संख्या घटली आहे आणि कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. ही साथ आता आरोग्य यंत्रणेच्या पूर्ण नियंत्रणात असून ती लवकरच संपण्याच्या मार्गावर आहे.गुरुवारी जिल्ह्यात केवळ ७४ नवीन रुग्ण आढळून आले. नवीन रुग्णांचे प्रमाण ९.४७ टक्के आहे; तर ७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण त्यामुळे ९२.४६ टक्क्यांवर पोहोचले. नवीन रुग्णांची संख्या घटणे आणि कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढणे यांमुळे आरोग्य यंत्रणा आता निवांत झाली आहे.केवळ तिघांचा मृत्यूजिल्ह्यात गुरुवारी तीन रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. शाहूवाडीतील ४२ वर्षीय पुरुष, शिरोळमधील नांदणी गावचे ६३ वर्षांचे रुग्ण, तर इस्लामपूर येथील ७२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.तीन तालुक्यांत एकही रुग्ण नाहीआजरा, कागल व शाहूवाडी या तीन तालुक्यांत एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. भुदरगड, गडहिंग्लज, गगनबावडा, राधानगरी या चार तालुक्यांत प्रत्येकी केवळ एकाच रुग्णाची नोंद झाली. पन्हाळा तालुक्यात दोन, चंदगड तालुक्यात तीन, हातकणंगले तालुक्यात आठ, करवीर तालुक्यात चार, तर शिरोळ तालुक्यात पाच रुग्ण आढळले. कोल्हापूर शहरात मात्र ४० नव्या रुग्णांची भर पडली.

  • कोरोना रुग्णांची एकूण संख्या - ४७ हजार ६४३
  • कोरोनामुक्त रुग्णांची संख्या - ४४ हजार ०५३
  •  मृत रुग्णांची एकूण संख्या - १६१७
  •  उपचार घेणारे रुग्ण - १९७३
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिकाCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय