शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

corona virus : गरज नाही भ्यायची, फक्त दक्षता घ्यायची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 12:22 IST

घरातून किंवा अलगीकरण केंद्रातून तुम्हाला कोविड उपचार केंद्रावर आणले जाते. सीपीआर, डॉ. डी. वाय. पाटील हास्पिटलसह अन्य ठिकाणी आता ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. एकदा का तिथे दाखल झाल्यानंतर मग मात्र निर्धार करायचा की, मी ठणठणीत होऊन दहा दिवसांनी बाहेर पडणार आहे. घाबरायचं नाही, प्रत्येकामध्ये एक योद्धा दडलेला असतो. त्याला जागं करायचं आणि लढाई सुरू करायची. लक्ष्य एकच फक्त आपल्याला जिंकायचंय.

ठळक मुद्देगरज नाही भ्यायची, फक्त दक्षता घ्यायचीआवश्यक तेवढे खा, मोबाईलवर बोलत बसू नका, सकारात्मक रहा

समीर देशपांडेकोल्हापूर : घरातून किंवा अलगीकरण केंद्रातून तुम्हाला कोविड उपचार केंद्रावर आणले जाते. सीपीआर, डॉ. डी. वाय. पाटील हास्पिटलसह अन्य ठिकाणी आता ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. एकदा का तिथे दाखल झाल्यानंतर मग मात्र निर्धार करायचा की, मी ठणठणीत होऊन दहा दिवसांनी बाहेर पडणार आहे. घाबरायचं नाही, प्रत्येकामध्ये एक योद्धा दडलेला असतो. त्याला जागं करायचं आणि लढाई सुरू करायची. लक्ष्य एकच फक्त आपल्याला जिंकायचंय.कोरोना झाल्यामुळे लगेच प्रचंड त्रास होतो असे काहीही नाही. माझ्यासह जे २० पाझिटिव्ह रुग्ण होते, त्यातील आम्ही १५ जण दोन दिवसांतच ठणठणीत झालो. फक्त सुरुवातीला थोडा ताप, घशात खवखव आणि थोडा खोकला अशी लक्षणे असतात. तिथे एकदा औषधे सुरू केली की ही लक्षणेही नाहीशी होतात. फक्त त्यानंतर आठ दिवस तुम्ही सकारात्मक पद्धतीने राहण्याची एक सवय लावून घेण्याची गरज आहे. तेथील सुविधा, गैरसोयी याबाबतीत नकारात्मक विचार न करता हे सर्व डाक्टर्स आणि स्टाफ मला बरे करण्यासाठी राबत आहे याची जाणीव ठेवायची. बाकी सगळं बाजूला ठेवायचं आणि आपली तब्येत ठाकठीक कशी राहील याकडे लक्ष द्यायचं.प्रत्येक फोन घेण्याची गरज नाहीआपण रुग्णालयात दाखल होण्याआधीपासून नातेवाईक, गल्लीतील शेजारी, मित्रपरिवार, हितचिंतक यांच्या फोनचा मारा सुरू होतो. अशावेळी आपल्याला जेवढे अतिगरजेचे आहेत, तेवढेच फोन घ्या. सगळ्यांनीच काळजी वाटूनच फोन केलेला असतो. धीर देण्यासाठीच फोन केलेला असतो. हे समजून घेऊन प्रत्येकाचा फोन घेण्यापेक्षा केवळ अत्यावश्यक फोन घ्या. प्रत्येकाला आपण कुठे फिरत होतो आणि मला कोरोना कसा झाला कळलेच नाही हा इतिहास सांगत बसण्याची गरज नाही. त्यामुळे तुमच्या घशावर ताण येतो. जो हिताचा नसतो. मी असे शेकडो फोन घेणे टाळले. नंतर त्यांची दिलगिरीही व्यक्त केली. परंतु त्याचा मला फायदा झाला.मोबाईल सायलेंट करा आणि झोपाआपण पॉझिटिव्ह आल्यानंतर आपल्यामुळे आणखी कितीजणांना लागण झाली आहे याची माहिती आपल्याला सोशल मीडियावरून लगेच समजायला लागते. अशावेळी आपण मानसिकरीत्या शांत राहण्याची गरज आहे. आपण पुन्हा निगेटिव्ह येण्यासाठी तुमची तब्येत महत्त्वाची असल्याने तुम्हाला शांतपणे झोप लागण्याची गरज आहे. म्हणून मोबाईल सायलेंट करून शांतपणे अधिकाधिक झोप घेण्याचा प्रयत्न करा.चमचमीत पदार्थ टाळाचवीत बदल म्हणून पाहुणे, घरचे घरातून डबा देतात; पण अनेकदा त्यामध्ये पथ्य पाळले जात नाही. मसालेदार अंडा करीपासून ते तेलाने थपथपलेल्या अंडा आम्लेटपर्यंतचे जेवण पाठविले जाते. परंतु ते आरोग्यासाठी फारसे हिताचे नाही हे लक्षात घ्या. प्रत्येकवेळी तुम्हाला डाक्टर तुमचा डबा बघून काय खावा, काय खाऊ नका सांगायला येणार नाहीत. तेथे तुम्हाला दिलेले जेवण हे पुरेसे असते. उकडलेली अंडी, फळे दिली जातात. ती आवर्जून खावा; पण तिथल्या जेवणातून आलेले दही अगदीच आंबट असेल, लोणचेही आंबट असेल तर सगळ्यांचा चवीपुरताच आस्वाद घ्या. आपला घसा या सगळ्याला कसा प्रतिसाद देईल याचा विचार करून आंबट, तेलकट, तिखट खाणे टाळण्याची गरज आहे.गरम पाणी प्यासर्वांकडेच गरम पाणी करण्याची किटली जरी नसली, तरी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून सकाळी, सायंकाळी एक एक ग्लास गरम पाणी मागून घ्या. अशावेळी कुणी नाही म्हणत नाही. आपल्या घशाला सोसेल अशा पद्धतीने गरम किंवा कोमट पाणी प्या.गोळ्या चुकवू नकाआपण तेथे दाखल झाल्यानंतर तेथे आपल्यावर उपचार सुरू होतात. ज्यांना श्वसनाचा त्रास आहे, रक्तदाब आहे, मधुमेह आहे अशांकडे विशेष लक्ष दिले जाते. इतरांना गोळ्या दिल्या जातात. गोळ्यांची संख्या सकाळी ५/६, सायंकाळी ५/६ असते. मात्र, गोळ्या घेणे टाळू नका. सांगितल्यानुसार जेवणाआधी आणि नंतर गोळ्या घ्या.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर