शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : शिवाजी विद्यापीठाकडून यंदा शुल्कवाढ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 17:22 IST

शिवाजी विद्यापीठाकडून यंदा विविध विनाअनुदानित अभ्यासक्रमांची शुल्कवाढ करण्यात येणार नाही. कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा विचार करून विद्यापीठाने पुढील वर्षापर्यंत शुल्कवाढ स्थगित केली आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांना दिलासा मिळणार आहे.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाकडून यंदा शुल्कवाढ नाही विनाअनुदानित अभ्यासक्रमांचा समावेश : कोरोनामुळे निर्णय

 कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाकडून यंदा विविध विनाअनुदानित अभ्यासक्रमांची शुल्कवाढ करण्यात येणार नाही. कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा विचार करून विद्यापीठाने पुढील वर्षापर्यंत शुल्कवाढ स्थगित केली आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांना दिलासा मिळणार आहे.

कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम विनाअनुदानित तत्त्वावर सुरू आहेत. या अभ्यासक्रमांचे शुल्क यावर्षी दहा टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता. त्याची अंमलबजावणीदेखील केली जाणार होती.

मात्र, कोरोनामुळे निर्माण झालेल्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना वाढीव शुल्क भरणे शक्य नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे विद्यापीठ अधिकार मंडळाच्या निर्णयानुसार विद्यापीठ अधिविभाग आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये सुरू असणाऱ्या विविध विनाअनुदानित अभ्यासक्रमांची यावर्षीची शुल्कवाढ स्थगित करण्यात आली असल्याची माहिती कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी मंगळवारी दिली.ऑनलाईन अध्यन, अध्यापनकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दक्षता म्हणून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे अध्यन, अध्यापन हे ऑनलाईन पद्धतीने करावे, अशी सूचना विद्यापीठाने विविध अधिविभाग आणि संलग्नित महाविद्यालयांना केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याShivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूरEducationशिक्षण