शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

corona virus :महापालिकेचे पोस्ट कोविड केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 18:31 IST

muncipaltycarporation, coronavirus,kolhapurnews कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने शाहू स्मारक भवन येथे सुरू केलेल्या पोस्ट कोविड केंद्राचे उद्घाटन बुधवारी महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनामुक्त झाल्यानंतरही काही त्रास होऊ लागल्यास अशा रुग्णांना येथे वैद्यकीय उपचार मिळणार आहेत.

ठळक मुद्देमहापालिकेचे पोस्ट कोविड केंद्र सुरूकोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना त्रास झाल्यास ‍मिळणार दिलासा : महापौर

कोल्हापूर : महानगरपालिकेच्यावतीने शाहू स्मारक भवन येथे सुरू केलेल्या पोस्ट कोविड केंद्राचे उद्घाटन बुधवारी महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनामुक्त झाल्यानंतरही काही त्रास होऊ लागल्यास अशा रुग्णांना येथे वैद्यकीय उपचार मिळणार आहेत.यावेळी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, गटनेते राहुल चव्हाण, उपायुक्त निखिल मोरे, युवराज दबडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल माने, डॉ. रमेश जाधव, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर उपस्थित होते.कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना काही त्रास होऊ लागल्यास महानगरपालिकेच्यावतीने सुरू केलेल्या पोस्ट कोविड केंद्रामध्ये त्यांच्यासाठी उपचाराच्या व समुपदेशनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. रुग्णांना काही त्रास होऊ लागल्यास त्यांच्यासाठी तपासणी, उपचार आणि संदर्भ सेवा देण्याबरोबरच फिजिओथेरपी तसेच मानसिक आधारासाठी समुपदेशनाचे कामही केले जाणार आहे.

केंद्रात रुग्ण नोंदणी कक्ष, नर्सिंग कक्ष, औषध कक्ष, डॉक्टर कक्ष, तपासणी कक्ष आणि प्रतीक्षा कक्ष अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, असे महापौर आजरेकर यांनी सांगितले.सद्या कोरोना कमी झाला असला तरी कोरोनाचा धोका टळलेला नसल्याने नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपायोजनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आयुक्त बलकवडे यांनी यावेळी केले.

  • पोस्ट कोविड केंद्राची वेळ सकाळी आठ ते रात्री आठ.
  • दुपारी एक ते तीन या वेळेत मिळणार तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला
  •  डॉक्टर्स, फिजिओथेरपी, समुपदेशन, नर्सिंग स्टाफ उपलब्ध करून देणार.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर