शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : थुंकण्याविरोधात शहरात चळवळ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 18:58 IST

रोगराई पसरण्यासाठी थुंकण्यामुळे बळ मिळते; म्हणूनच या थुंकण्याविरोधात शहरामध्ये चळवळ उभी करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या एड‌्स नियंत्रण विभागाच्या सीपीआर रुग्णालयातील कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी या कामी पुढाकार घेतला आहे. यासाठी अनेकजण आता पुढे येत असून लवकरच कृती कार्यक्रमही जाहीर करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देथुंकण्याविरोधात शहरात चळवळ सुरूविविध उपक्रमांच्या माध्यमातून होणार जनजागरण

कोल्हापूर : रोगराई पसरण्यासाठी थुंकण्यामुळे बळ मिळते; म्हणूनच या थुंकण्याविरोधात शहरामध्ये चळवळ उभी करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या एड‌्स नियंत्रण विभागाच्या सीपीआर रुग्णालयातील कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी या कामी पुढाकार घेतला आहे. यासाठी अनेकजण आता पुढे येत असून लवकरच कृती कार्यक्रमही जाहीर करण्यात येणार आहे.शिपूरकर यांनी गेल्या दोन महिन्यांपासून थुंकण्याविरोधात वातावरण तयार करण्यास सुरुवात केली आहे. थुंकीतून कोरोनाचा प्रसार होत असल्याने रस्त्यावर थुंकणाऱ्यांना त्यांनी जागेवरच जाब विचारण्यास सुरुवात केली होती. त्यांचे फोटोही समाजमाध्यमावर त्यांनी प्रसारित केले होते. यातूनच त्यांना ह्यथुंकण्याविरोधात चळवळह्ण ही कल्पना सुचली.यासाठी त्यांनी व्हॉट‌्स ॲप ग्रुप तयार केला असून, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या आठवड्यामध्ये यासाठी आता कृती कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे. या अंतर्गत गुटखाविक्रीची माहिती देणे, रस्त्यांवर थुंकणाऱ्यांचे फोटो काढून ते प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे, शहरातील सीसीटीव्हींचा वापर करून थुंकणाऱ्यांना नोटिसा काढण्याबाबत आग्रह धरणे, मास्क नसल्याने जसा दंड होतो तसा थुंकल्याबद्दल दंड करणे, हॉटस्पॉटवर जास्त लक्ष केंद्रित करणे, शहरातील होर्डिंगवरून जनजागरण करणे यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 

 

ही एक चांगली चळवळ कोल्हापूरमध्ये सुरू करण्यात आली आहे. अशा चळवळीची गरज या कोरोनाच्या काळात अधोरेखित झाली आहे. आपण तंबाखू, गुटखा, पान खाऊन थुंकतो आणि परिसर गलिच्छ करतो, याचे भान नागरिकांना नसते. सुशिक्षितही यामध्ये मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे हे काम सोपे नाही. तरीही चळवळीच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये थुंकण्याविरोधात वातावरण तयार करण्यात यश येईल, असा मला विश्वास आहे.- सुरेश शिपूरकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर