शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : मास्क हाय; पण हनुवटीला !शहरातील बहुतांश बाजारपेठा, परिसरांतील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 16:02 IST

कोल्हापूर शहरात कोरोना महामारीचा अक्षरश: कहर सुरू आहे. दिवसाकाठी पाचशे ते हजार लोक बाधित होत असून, त्यातून मृत्यूचे प्रमाणही धक्कादायक आहे. तरीसुद्धा अनेकजण विनामास्क, तर काहीजण हनुवटीला मास्क लावून फिरत आहेत; त्यामुळे संसर्गाचा धोका वाढू लागला आहे.

ठळक मुद्देमास्क हाय; पण हनुवटीला !शहरातील बहुतांश बाजारपेठा, परिसरांतील स्थिती

कोल्हापूर : शहरात कोरोना महामारीचा अक्षरश: कहर सुरू आहे. दिवसाकाठी पाचशे ते हजार लोक बाधित होत असून, त्यातून मृत्यूचे प्रमाणही धक्कादायक आहे. तरीसुद्धा अनेकजण विनामास्क, तर काहीजण हनुवटीला मास्क लावून फिरत आहेत; त्यामुळे संसर्गाचा धोका वाढू लागला आहे.राज्य व केंद्र सरकारने अन‌्लॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर नागरिकांना अनेक सवलती दिल्या. दुकाने, मॉल पूर्णपणे सुरू झाले आहेत. प्रवास करण्यावरील बंदी हटविण्यात आली. त्यात महापालिकेचा आरोग्य विभाग कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नागरिकांना सुरक्षित अंतर व मास्क घालावा, अशा सूचनाही वारंवार देत आहे. तरीसुद्धा २० टक्के लोक मास्क न वापरता मला काहीच संसर्ग होणार नाही,ह्ण अशा आविर्भावात फिरत आहेत; त्यामुळे एकापासून अनेकांना त्याची लागण होत आहे.

विशेष म्हणजे लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, महाद्वार रोड, पापाची तिकटी, रंकाळा तलाव चौपाटी परिसर, गंगावेश परिसर, राजारामपुरी, शाहूपुरी, स्टेशन रोड, आदी परिसरांत हातगाडीवरून भाजीपाला व अन्य वस्तू विक्री करणारे फेरीवाले व तरुण मंडळी विनामास्क फिरत आहेत. अनेक तरुण दुचाकीवरून जाताना जणू कोरोनाचा कहर संपला असल्यासारखे दोघे-दोघे एकत्रित फिरत आहेत. यासोबतच अनेक पेठांमधील तरुण मंडळांचे कट्ट्यावर एकत्रित गप्पा मारत बसण्याचे प्रमाणही वाढले आहे.

अनेक पानटपऱ्यांवर, ज्या बहुतांश स्पेशल पाने तयार करतात, अशांच्या दुकानांसमोर युवक मंडळींची गर्दी दिसू लागली आहे. रविवारपासून प्रशासनाने मास्क न वापरणाऱ्यांवर २०० रुपये इतका दंड वसूल करण्याचा फतवा काढला आहे. तरीसुद्धा अनेक महाभाग विनामास्क किंवा मास्क हनुवटीला लावून बिनधास्त फिरत आहेत.

अशा बिनधास्त वागण्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. त्यातून मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. मात्र, मास्क लावून बाहेर पडण्याची अनेक महाभागांची मानसिकता बदलत नाही. यावर प्रशासनाचा २०० रुपये दंडाचा बडगा चांगलाच प्रभावी ठरेल, अशी चर्चा आता सुज्ञ शहरवासीयांतून होत आहे.कपिलतीर्थमध्ये १० माणसांमध्ये दोघेजण विनामास्क, तर चारजणांचे मास्क हनुवटीला आणि चारजणांचे मास्क नियमानुसार तोंडावर आढळून आले. तर लक्ष्मीपुरी बाजारात तर ५० स्त्री-पुरुषांपैकी २० जणांनी अगदी नियमानुसार, तर १० महिलांनी मास्कऐवजी स्कार्फ बांधून पूर्ण चेहराच झाकला होता.

अन्य वीसजणांपैकी ११ जणांनी नावापुरता रुमाल बांधून तोही वेड्यावाकड्या पद्धतीने हनुवटीवर बांधला होता; तर नऊ महाभाग विनामास्कच खरेदीला आले होते. स्टेशन रोड, फोर्ड कॉर्नर, कोंडा ओळ, सुभाष रोड, राजाराम रोडवर प्रत्येक दहाजणांपैकी दोन ते तीनजण विनामास्क फिरताना दिसत होते. बहुतांश मास्क न वापरणारी मंडळी तरुण वर्गातील आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर