शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

CoronaVirus Lockdown : ‘हौसला’ने दिला गर्भवतींना ‘हौसला’, राज्यातील ६ विभागात उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 14:06 IST

कोरोनाच्या लढ्यात डॉक्टर, पोलिस, प्रशासकीय अधिकारी, सफाई कामगार जीवाची बाजी लावून अविरतपणे सेवा बजावत आहेत. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद होवून मानवी दिनचक्र विस्कळीत झाले. वाहतुकीची साधनेही उपलब्ध होत नव्हती. अशावेळी गरोदर मातांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांना वेळेत मदत मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड येथील डॉ. राहूल इंगळे यांनी ‘हौसला’ या व्हॉटस् अ‍ॅपग्रुपच्या माध्यमातून केलेला प्रयत्न निश्चितच वाखाणण्याजोगा आहे.

ठळक मुद्दे ‘हौसला’ने दिला गर्भवतींना ‘हौसला’, राज्यातील ६ विभागात उपक्रम व्हॉटस अ‍ॅप् ग्रुपच्या माध्यमातून गरजूंना सेवा

शिवानंद पाटील

गडहिंग्लज : कोरोनाच्या लढ्यात डॉक्टर, पोलिस, प्रशासकीय अधिकारी, सफाई कामगार जीवाची बाजी लावून अविरतपणे सेवा बजावत आहेत. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद होवून मानवी दिनचक्र विस्कळीत झाले. वाहतुकीची साधनेही उपलब्ध होत नव्हती. अशावेळी गरोदर मातांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांना वेळेत मदत मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड येथील डॉ. राहूल इंगळे यांनी ‘हौसला’ या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून केलेला प्रयत्न निश्चितच वाखाणण्याजोगा आहे.या ग्रुपमध्ये राज्यातील विविध भागातील पोलिस, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, गृहिणी आदी अनेक क्षेत्रातील व्यक्ती जोडल्या आहेत. ग्रुपचे फेसबुक पेजदेखील सुरू करण्यात आले आहे. ‘हौसला’कडून गरोदर मातांच्या सेवेसाठी त्यांच्यानजीकचे हॉस्पिटल, डॉक्टर, वाहतुकीची साधने उपलब्ध करून देण्याचे काम केले जाते. लॉकडाऊनच्या काळात राज्यभरातून या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अनेक माता-भगिनींच्या सुखरूप प्रसुत्या झाल्या.राज्यात पुणे, औरंगाबाद, मुंबई, अमरावती, नागनूर व लातूर या सहा विभागात हौसलाचे काम सुरू आहे. यातील अनेकजण एकमेकांना कधीही भेटले नाहीत. परंतु, सेवा भावनेतून सर्वजण काम करीत आहेत. कोणत्याही गरोदर मातेला मदतीची गरज असेल तर संबंधित विभागातील सदस्याला संपर्क करून मदतीचे आवाहन केले जाते.या उपक्रमात डॉ. अजित कृष्णन (सिंधुदूर्ग), गौतम सुरवाडे (जळगाव), वैशाली संकपाळ (पुणे), करण बेरकर व गणेश कांबळे (मुंबई), डॉ. नागमणी रेड्डी (गडहिंग्लज), राजभाऊ भालेराव, संध्या निकाळजे व अश्विनी वाघ (पुणे) आदींसह ३०० हून अधिकजण कार्यरत आहेत.

७० मातांनी घेतला लाभ‘हौसला’च्या कार्याला सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ७० गर्भवतींना सेवा देण्यात आली आहे. राज्यातील सर्व व्यवहार सुरळीत होईपर्यंत ‘हौसला’चे काम सुरू राहणार आहे. त्यानंतरही गरजूंना सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. भविष्यात एखाद्या अद्ययावत रूग्णालयाची निर्मिती करण्याचा मानस असल्याचे ग्रुपच्या सदस्य नामगणी रेड्डी यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपkolhapurकोल्हापूरpregnant womanगर्भवती महिला