शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -परदेशी प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवा: पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 17:16 IST

कोल्हापूर : परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्याची व्यवस्था करा. त्याचबरोबर ज्यांना घरी अलगीकरण होण्याची व्यवस्था नाही अशांनाही ...

ठळक मुद्देपरदेशी प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवा: पालकमंत्री ‘सीपीआर’कक्षाला वेळोवेळी भेट देण्याबाबत गजभिये यांना निर्देश

कोल्हापूर : परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्याची व्यवस्था करा. त्याचबरोबर ज्यांना घरी अलगीकरण होण्याची व्यवस्था नाही अशांनाही संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी येथे दिले.‘सीपीआर’ कक्षाला वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी भेट देऊन माहिती घ्यावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू संसर्गाच्या उपाययोजनांसंसर्भात प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, आरोग्य उपसंचालक डॉ. हेमंतकुमार बोरसे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील आदी उपस्थित होते.तपासणी नाक्यांवर तसेच विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची काटेकोर तपासणी करा, सर्वांनी सतर्क राहून जबाबदारी पूर्ण करा, ज्यांना घरीच अलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यांची तपासणी करा, सीपीआरमध्ये येणाया प्रवाशांची सविस्तर माहिती घेवून त्यांची तपासणी करावी. अधिष्ठाता डॉ. गजभिये यांनी वेळोवेळी येथील कक्षाला भेट देवून माहिती घ्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर