शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोटातून आलेल्या विद्यार्थ्यांचा कोरोनाविरोधातील लढ्यासाठी मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 14:50 IST

कोटा (राजस्थान) येथून घरी सुखरूप आलेल्या ४० विद्यार्थी आणि पालकांनी सामाजिक बांधीलकी जपत कोरोना विरोधातील लढ्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनास ४५ हजार रुपयांची मदत केली. या निधीचा धनादेश त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे गुरुवारी सुपूर्द केला. या विद्यार्थ्यांना घेऊन आलेल्या एस.टी. चालकांना पालकांनी आठ हजार रुपयांचे बक्षीस दिले.

ठळक मुद्देकोटातून आलेल्या विद्यार्थ्यांचा कोरोनाविरोधातील लढ्यासाठी मदतीचा हातसतेज पाटील यांच्याकडे निधीचा धनादेश सुपूर्द : एस.टी.चालकांना बक्षीस

कोल्हापूर : कोटा (राजस्थान) येथून घरी सुखरूप आलेल्या ४० विद्यार्थी आणि पालकांनी सामाजिक बांधीलकी जपत कोरोना विरोधातील लढ्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनास ४५ हजार रुपयांची मदत केली. या निधीचा धनादेश त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे गुरुवारी सुपूर्द केला. या विद्यार्थ्यांना घेऊन आलेल्या एस.टी. चालकांना पालकांनी आठ हजार रुपयांचे बक्षीस दिले.कोटा येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी कोल्हापुरात आल्यावर त्यांना प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस येथील वसतिगृहात इन्स्टिट्यूट क्वारंटाईन केले होते. मात्र त्यांच्या शैक्षणिक अभ्यासासाठी त्यांना घरी जायचे होते. या विद्यार्थी, पालकांनी पालकमंत्री पाटील यांना विनंती करून घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्याबाबत पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यासाठी सूचित केले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थी, पालकांचे हमीपत्र घेऊन त्यांना घरी सोडले.

घरी गेल्याने या विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरळीत झाला. त्यावर त्यांनी सामाजिक बांधीलकी जपत ४५ हजारांचा धनादेश पालकमंत्री पाटील यांच्याकडे दिला. यावेळी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, उद्योगपती महावीर गाट, माजी राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजू लाटकर, उद्योगपती जयेश ओसवाल, पालकांच्या वतीने उदय वाशीकर, श्वेता वाशीकर, सुहास पाटील, शिवाजी पाटील, महेश टोणे उपस्थित होते.

दरम्यान, या विद्यार्थ्यांना कोल्हापुरात आणण्यासाठी पालकमंत्री पाटील यांच्यासह ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार राजेश क्षीरसागर, डॉ. सुजित मिणचेकर यांचे सहकार्य लाभल्याचे पालकांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील