शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur- पालकमंत्र्यांचा मुक्काम जिल्हाधिकारी कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 18:19 IST

कोरोनाविरुद्धच्या लढाईत लोकांना घरी थांबविणे हेच मोठे अवघड काम असून, घरी थांबलेल्या लोकांना कोणताही त्रास होणार नाही, यावर पालकमंत्री सतेज पाटील यांचा भर आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचा मुक्काम जिल्हाधिकारी कार्यालयातलोकांना काही त्रास होऊ नये यावर भर

कोल्हापूर : कोरोनाविरुद्धच्या लढाईत लोकांना घरी थांबविणे हेच मोठे अवघड काम असून, घरी थांबलेल्या लोकांना कोणताही त्रास होणार नाही, यावर पालकमंत्री सतेज पाटील यांचा भर आहे. दूध, धान्य, भाजीपाला, गॅस आणि औषधे सुलभरीत्या उपलब्ध होऊ शकतात, हे जर लोकांना समजले तर ते रस्त्यांवर येणार नाहीत. त्यामुळे ते या गोष्टींसाठी पॅनिक होणार नाहीत, याची काळजी पालकमंत्र्यांनी घेतली आहे.या संकटात राज्य शासन जसे लोकांच्या मदतीला धावून येत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे, तसाच अनुभव कोल्हापूर जिल्हा प्रशासनाबाबत लोकांना येत आहे आणि या प्रशासनामध्ये समन्वय ठेवून त्यांना दिशा देण्याचे काम सतेज पाटील यांच्याकडून सुरू आहे.

सकाळी अंघोळ झाली की ते जिल्हाधिकारी कार्यालयात येतात ते रात्रीच कधीतरी घरी जातात. कुणाचा मुलगा पुण्यात अडकला आहे, त्याला कोल्हापूरला आणायचा आहे, येथपासून ते शहरातील लोकांना भाजीपाला कसा उपलब्ध होईल;. ग्रामीण भागात गावसमितीच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कसा होईल, यावरही ते बारकाईने लक्ष ठेवून आहेत. एकाच वेळी रुग्णालयांतील व्यवस्था, रुग्णतपासणी, त्यांचे विलगीकरण यांकडेही त्यांचे तितकेच लक्ष आहे.

दोन दिवसांपूर्वी त्यांनी होम क्वारंटाईनमधील लोकांची यादी घेऊन त्यांतील प्रत्येक व्यक्तीशी स्वत:सह वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधायला लावला. त्यांना धीर दिला. प्रांताधिकारी, तहसिसीलदार यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग घेऊन त्यांची यंत्रणा कामाला लावली.

या सगळ्यांचे फलित म्हणून उपचारांपासून लोकांच्या नागरी सेवासुविधांपर्यंत कुठेही गोंधळ, तक्रारी असल्याचे चित्र नाही. सारा जिल्हा एकजुटीने या संकटाला सामोरे जात आहे, असा दिलासा लोकांना मिळत आहे.मुख्यमंत्र्यांचा सातत्याने संपर्कपालकमंत्री पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दैनंदिन घडामोडींचा आढावा घेत आहेत. उपाययोजनेसह शासनाकडून केल्या जाणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी करून घेण्यासाठी पालकमंत्री प्रयत्नशील आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर