शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : जिल्ह्यातील २८०० शिक्षकांना गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 15:24 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे एकूण २८०० शिक्षक हे गुगल क्लासरूमच्या प्रशिक्षणाचे धडे गिरविणार आहेत. त्यांच्याकडून नावनोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील २८०० शिक्षकांना गुगल क्लासरूमचे प्रशिक्षणनोंदणी पूर्ण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपक्रम

कोल्हापूर : जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे एकूण २८०० शिक्षक हे गुगल क्लासरूमच्या प्रशिक्षणाचे धडे गिरविणार आहेत. त्यांच्याकडून नावनोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

सध्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद असली, तरी तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षक आणि विद्यार्थी यांना एकमेकांशी संवाद साधता यावा, यासाठी शासनाने ऑनलाईन शिक्षण देण्याचे पाऊल टाकले आहे.

ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी आवश्यक असणारा ई-कंटेंट, व्हिडिओ बनविणे, ब्लॉग तयार करणे, ॲप बनविणे, आदींबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील २८०० शिक्षकांनी नोंदणी केली आहे. त्यांचे प्रशिक्षण लवकरच सुरू होणार आहे.

दरम्यान, प्रशिक्षणाचा उपक्रम दोन टप्प्यांमध्ये राबविला जाणार आहे. त्यँतील पहिल्या टप्प्यासाठी शिक्षकांनी नोंदणी केली केली. दुसरा टप्पा ल‌वकरच सुरू होणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी सांगितले.जिल्ह्यात १९०० तंत्रस्नेही शिक्षकगेल्या दोन वर्षांमध्ये १९०० शिक्षकांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण दिले आहे. त्यांना व्हिडिओ, पीपीटी तयार करणे, दीक्षा ॲपचा वापर, आदींचे प्रशिक्षण देण्यात आले आले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सूचनेनुसार आता गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. आय. सी. शेख यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTeacherशिक्षकkolhapurकोल्हापूर