शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

corona virus : कोरोना रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या, पालकमंत्री पाटील यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 13:07 IST

कोल्हापूर शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि मृत्युदर कमी करण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात यावा. हायरिस्क, व्याधीग्रस्त आणि संशयितांसाठी उपाययोजनांचा सूक्ष्म कृती आराखडा तयार करून नियोजनबद्ध काम करा, असे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.

ठळक मुद्देकोरोना रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या-पालकमंत्री पाटील यांचे आवाहन हॉटस्पॉटमध्ये अधिक दक्षता घेण्याचे आदेश

कोल्हापूर : शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि मृत्युदर कमी करण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात यावा. हायरिस्क, व्याधीग्रस्त आणि संशयितांसाठी उपाययोजनांचा सूक्ष्म कृती आराखडा तयार करून नियोजनबद्ध काम करा, असे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.महानगरपालिकेच्यावतीने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनेबाबत अजिंक्यतारा येथे महापालिका, पदाधिकारी व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती शोभा कवाळे, प्राथमिक शिक्षण समिती सभापती श्रावण फडतारे, गटनेते शारगंधर देशमुख यांची प्रमुख उपस्थित होती.

पालकमंत्री पाटील म्हणाले, फिल्डवरील यंत्रणेला येणारे अनुभव आणि अडचणी यांचा अभ्यास करून कोरोनाची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तपासणी, निदान आणि उपचार याबाबत कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा अभ्यास करून व्यक्तीनिहाय डेटा संकलित करावा.आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या बिलांची तपासणी करून योग्य तेच बिल देण्याबाबत महापालिकेने ऑडिटरांची स्वतंत्र विंग तयार केली आहे. माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम अधिक प्रभावी राबवून लोकजागृतीची लोकचळवळ उभी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.मृत्युदर शून्यावर आणाकोरोनाचा मृत्युदर शून्यावर आणणे महत्त्वाचे असून यासाठी अधिकाधिक कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे गरजेचे आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमुळे हायरिस्क, व्याधीग्रस्त आणि संशयितांची तपासणी होऊन निदान लवकर होईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.हॉटस्पॉटमध्ये यंत्रणा अधिक दक्ष ठेवाकोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी महापालिका यंत्रणेने अधिक दक्षता घेऊन उपाययोजनांचे सूक्ष्म नियोजन करावे. यामध्ये कॉलनीनिहाय, गल्लीनिहाय आणि अपार्टमेंटनिहाय नियोजन करण्याचे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.पालकमंत्र्यांच्या सूचना

  • होम टू होम सर्व्हे करताना एकही व्यक्ती सुटता कामा नये
  • कोरोनामुळे मृत झालेल्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी पाठपुरावा करू.
  • हायरिस्क, संशयित आणि लक्षणे दिसणाऱ्या लोकांचे स्वॅब तपासणीसाठी यंत्रणा सक्षम करा.
  • होम आयसोलेशन असणाऱ्या जवळपास ६८५ व्यक्तींची माहिती संबंधित पोलीस ठाण्यास देऊन त्यांच्यामार्फतही मॉनिटरींग करा.
  • होम टू होम सर्व्हेमध्ये लक्षणे दिसल्यास तत्काळ तपासणी करून घ्या.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर