शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : राज्य शासनाने निर्देश येईपर्यंत ई पास सक्तीचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 20:11 IST

केंद्र सरकारने ई-पास सेवा रद्द केली असली तरी राज्य शासनाने त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्य शासनाचे पुढील निर्देश येईपर्यंत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास सक्तीचेच असणार आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाने निर्देश येईपर्यंत ई पास सक्तीचेचई-पास मागणीच्या अर्जात घट

कोल्हापूर : केंद्र सरकारने ई-पास सेवा रद्द केली असली तरी राज्य शासनाने त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्य शासनाचे पुढील निर्देश येईपर्यंत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास सक्तीचेच असणार आहे.देशात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू असून त्याअंतर्गत रविवारी केंद्र सरकारने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तसेच जिल्ह्यात जाण्यासाठी ई- पास सक्तीचे नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ई-पास सेवा रद्द करण्यात आली आहे. असे असले तरी त्याबाबतचा निर्णय ज्या-त्या राज्यांनी तेथील परिस्थितीनुसार घ्यायचा आहे, त्याचे सर्वाधिकारी राज्य शासनाने असणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही एका मुलाखतीत ई -पासचा निर्णय महाराष्ट्रातील परिस्थिती पाहून घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते.सध्या हे ई-पास जिल्हा प्रशासनाकडून दिले जातात. राज्य शासनाने ई-पासबाबतचे धोरण अद्याप स्पष्ट केलेले नसल्याने अजूनही कोल्हापूरकर तसेच राज्यातील नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास काढावे लागणार आहेत. सध्या ई-पास मागणीच्या अर्जात घट झाली असून दिवसाला सरासरी दीड हजारांवर अर्ज येत आहेत तर प्रलंबित अर्जांची संख्या केवळ पाचशे इतकी आहे.

ई-पासबाबत राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला कोणतेही निर्देश आलेले नाहीत. त्यामुळे सध्या तरी ई-पास सक्तीचे आहे. राज्य शासनाचे निर्देश आल्यानंतर त्याबाबत पुढील कार्यवाही होईल.रंजना बिचकर,ई -पास वितरण मुख्य अधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर