शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -जिल्हा पोलीस प्रमुखांसमोरच वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये मतभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 18:54 IST

सीपीआर परिसरात लावलेला बंदोबस्त पाहण्यासाठी आलेले जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्यासमोरच वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआरमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये मतभेद उफाळून आले.

ठळक मुद्देजिल्हा पोलीस प्रमुखांसमोरच वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये मतभेदकेम्पीपाटील यांनी केले खंडन

कोल्हापूर : सीपीआर परिसरात लावलेला बंदोबस्त पाहण्यासाठी आलेले जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्यासमोरच वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआरमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये मतभेद उफाळून आले.सीपीआरमध्ये ज्या ठिकाणी कोरोना तपासणीसाठी केंद्र करण्यात आले आहे, त्या बाजूला इतर रुग्णांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या विभागाच्या दोन्ही बाजूला अडथळे लावून वाहतुकीलाही बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी दुपारी डॉ. अभिनव देशमुख बंदोबस्त पाहण्यासाठी आले होते.यावेळी त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांना निरोप दिला. त्यांच्यासह महेंद्र बनसोडे व इतर डॉक्टर देशमुख यांच्याशी चर्चा करीत होते. या ठिकाणी नेमक्या कोणाला प्रवेश आहे किंवा नाही याचा स्पष्ट फलक लावण्याची सूचना देशमुख यांनी यावेळी डॉ. गजभिये यांना केली.दरम्यान, डॉ. देशमुख आल्याचा निरोप शिपायांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांना दिला. लगेचच डॉ. केम्पीपाटील, डॉ. विलास देशमुख, डॉ. हर्षला वेदक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे आले.यावेळी गजभिये म्हणाल्या, सीपीआरकडे तपासण्यासाठी बहुतांशी रुग्ण येतात. त्यांची विभागणी करून त्यांना इतरही केंद्रांवर पाठविण्याची गरज आहे. त्यामुळे येथील यंत्रणेवरील ताण कमी होईल, असा दावा त्यांनी केला. मात्र, त्यांच्यासमोरच केम्पीपाटील यांनी खंडन केले. ते म्हणाले, ‘कोण, कुणाला, कुठे सांगणार तपासायला जा म्हणून. त्यांना सीपीआरलाच तपासायला जायचे असेल तर आम्ही दुसरीकडे जावा म्हणून सांगू शकत नाही.’ यावर डॉ. देशमुख म्हणाले, सीपीआरवर लोकांचा विश्वास आहे. तुम्ही सर्वजण चांगले काम करीत आहात म्हणूनच नागरिक तपासण्यासाठी इकडे येत आहेत. तुम्ही फक्त या ठिकाणी फलक लावा म्हणजे पोलिसांनाही या ठिकाणी नीट बंदोबस्त करता येईल.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर