शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कणेरकर नगरातील व्यक्तीस कोरोना; परिसर प्रतिबंधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 16:31 IST

न्यू कणेरकर नगरातील एक ६२ वर्षीय व्यक्तीस कोरोना झाल्याचे सोमवारी (दि. २२) मध्यरात्री स्पष्ट झाल्याने महानगरपालिका यंत्रणा सक्रिय झाली. संबंधित व्यक्ती राहत असलेला परिसर तत्काळ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून, तो चारी बाजूंनी सील करण्यात आला. त्या व्यक्तीच्या पत्नी व दोन मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांचे स्राव घेण्यात आले आहेत.

ठळक मुद्देकणेरकर नगरातील व्यक्तीस कोरोना; परिसर प्रतिबंधितमहापालिका यंत्रणा सक्रिय : निर्जंतुकीकरण मोहीम

 कोल्हापूर : न्यू कणेरकर नगरातील एक ६२ वर्षीय व्यक्तीस कोरोना झाल्याचे सोमवारी (दि. २२) मध्यरात्री स्पष्ट झाल्याने महानगरपालिका यंत्रणा सक्रिय झाली. संबंधित व्यक्ती राहत असलेला परिसर तत्काळ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून, तो चारी बाजूंनी सील करण्यात आला. त्या व्यक्तीच्या पत्नी व दोन मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांचे स्राव घेण्यात आले आहेत.शहरात यापूर्वी आढळलेल्या कोरोनाबाधित व्यक्ती या बाहेरगावांहून संसर्ग होऊन आलेल्या होत्या; तसेच बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाग्रस्त झाल्या होत्या. परंतु न्यू कणेरकर नगरातील ही व्यक्ती स्थानिक असून आजारी असल्याने त्यांना कोरोना झाल्याबद्दल आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून एका आजारावर उपचार करण्याकरिता या व्यक्तीस खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसत असल्यामुळे त्यांचे स्राव तपासणीसाठी देण्यात आले होते. सोमवारी रात्री १२ वाजता त्याचा अहवाल सीपीआर रुग्णालयाच्या हाती आला आणि तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तत्काळ महानगरपालिका यंत्रणेला त्याची खबर देण्यात आली.पालिकेचे गांधी मैदान विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता रमेश मस्कर, नगरसेविका वनिता देठे यांचे पुत्र अभिजित देठे यांच्यासह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ न्यू कणेरकर नगरात धाव घेऊन कोरोनाबाधित व्यक्तीच्या घरातील त्यांच्या पत्नी, दोन मुले यांना रुग्णालयात दाखल केले. तसेच घराभोवतीचा शंभर मीटर परिसर बॅरिकेट‌्स लावून सील केला. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ औषध फवारणी करून परिसर निर्जंतुक केला.नागरी आरोग्य केंद्राकडील कर्मचारी तसेच आशा वर्कर्स यांनी कोरोनाबाधित व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची यादी बनविण्याचे काम सुरू केले. मंगळवारी सकाळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी या परिसराला भेट देऊन पाहणी केली, तसेच अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका