शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : तपासणी किट संपल्यामुळे कोल्हापुरात कोरोना चाचणी रोडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 18:02 IST

कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे उभारण्यात आलेल्या कोरोना चाचणी लॅबोरेटरीमधील किट‌्स संपल्यामुळे गुरुवार (दि. ३०) व शुक्रवार असे दोन दिवस कोरोना चाचणी करण्यावर बऱ्याच मर्यादा आल्या.

ठळक मुद्देतपासणी किट संपल्यामुळे कोल्हापुरात कोरोना चाचणी रोडावली आठ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे उभारण्यात आलेल्या कोरोना चाचणी लॅबोरेटरीमधील किट‌्स संपल्यामुळे गुरुवार (दि. ३०) व शुक्रवार असे दोन दिवस कोरोना चाचणी करण्यावर बऱ्याच मर्यादा आल्या. रोज एक हजार ते बाराशे स्रावांची चाचणी होत असे; परंतु तांत्रिक अडचणीमुळे त्या ४०० पर्यंत खाली आल्या. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत आठ कोरोनाबाधित रुग्ण दगावले, तर नवीन ७० रुग्ण आढळून आले.कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला असून, लॅबोरेटरीमध्ये स्रावांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा महत्त्वाच्या वेळी शेंडा पार्क येथील लॅबोरेटरीमधील एक यंत्र केवळ किट‌्स उपलब्ध न झाल्यामुळे बंद ठेवावे लागले.

सध्या लॅबोरेटरीमध्ये सेमी ऑटोमॅटिक व फुल्ली ऑटोमॅटिक अशी दोन यंत्रे आहेत. त्यांपैकी फुल्ली ऑटोमॅटिक यंत्र किटस‌्अभावी बंद ठेवावे लागले, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. ठेकेदाराकडून किटस‌्चा वेळेवर पुरवठा न झाल्यामुळे ही नामुष्की ओढावली.लॅबमधील दोन यंत्रांवर रोज सरासरी एक हजार ते १२०० स्रावांची तपासणी होत होती. परंतु गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस एक यंत्र बंद ठेवावे लागल्यामुळे केवळ ४०० तपासण्या झाल्या. त्यामुळे रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही एकदम कमी झाले. लॅबोरेटरीकडे एक जादा यंत्र आले असून ते जोडण्याचे काम सुरू होते. शनिवारपासून हे नवीन यंत्र कार्यान्वित होईल, असे सांगण्यात आले.दरम्यान, गुरुवारी रात्री ते शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत ५० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले; तर शुक्रवारी सायंकाळपर्यंत २० रुग्ण आढळून आले. मात्र २४ तासांत जिल्ह्यातील आठ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये पाच पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे.

दोन रुग्ण सीपीआरमध्ये, एक रुग्ण आयजीएम, इचलकरंजी रुग्णालयात; तर पाच रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत झाले. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या आता १७६ वर जाऊन पोहोचली. एकूण रुग्णसंख्या ६१४५ वर गेली असून, त्यापैकी ३४३५ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर