शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

corona virus :कोरोना रुग्णांवर आता घरीच उपचाराचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 12:00 IST

केवळ १० दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १३५७ कोरोनाचे रुग्ण वाढले असून, हा कहर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच येणारे १५ दिवस कोल्हापूरकरांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. ११ ते २१ जुलै या १० दिवसांमधील या वाढत्या रुग्णसंख्येने रुग्ण दुप्पट होण्याचा वेग हा ४० दिवसांवरून केवळ आठ दिवसांवर आला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांवर आता घरांतूच उपचार करण्याचा पर्यायावर गंभीरपणे विचार सुरू झाला आहे. पुणे, पणजीमध्ये असा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देरुग्णसंख्या वाढली : दहा दिवसांत १३५७ रूग्णरूग्ण दुपटीचा वेग ८ दिवसांवर, अजूनही रूग्णांचे प्रमाण राहणार वाढते

समीर देशपांडे कोल्हापूर : केवळ १० दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १३५७ कोरोनाचे रुग्ण वाढले असून, हा कहर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच येणारे १५ दिवस कोल्हापूरकरांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. ११ ते २१ जुलै या १० दिवसांमधील या वाढत्या रुग्णसंख्येने रुग्ण दुप्पट होण्याचा वेग हा ४० दिवसांवरून केवळ आठ दिवसांवर आला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांवर आता घरांतूच उपचार करण्याचा पर्यायावर गंभीरपणे विचार सुरू झाला आहे. पुणे, पणजीमध्ये असा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.या १० दिवसांमध्ये तीन दिवस रुग्णसंख्येने २०० पेक्षा अधिक मजल मारली. १७ जुलै रोजी तर हा उच्चांकी आकडा तब्बल २९३ वर गेला. यातील दोन दिवस रुग्णसंख्या ही दीडशेपेक्षा जास्त झाली. उर्वरित चार दिवस हा आकडा ५० च्या वर राहिला. केवळ एकच दिवस हा आकडा ५० च्या आत म्हणजे ४७ राहिला. या १० दिवसांमध्ये ४१ जणांचा मृत्यू झाला आहे.याच पद्धतीने आपण १८ जून ते १८ जुलै या एका महिन्याचा आढावा घेतला तर परिस्थिती कशी बदलली हे आपल्या लक्षात येते. जून महिन्यातील १८ तारखेला जिल्ह्यामध्ये कोरोनाचे केवळ ७२८ रुग्ण होते; तर त्यांतील ६६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यामुळे केवळ ५२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते.

यानंतर ही संख्या खाली येत एक वेळ अशी आली की, केवळ ३६ रुग्णांवर उपचार सुरू होते. मात्र जुलै महिन्यामध्ये या परिस्थितीमध्ये मोठा फरक पडत गेला. १० जुलैपर्यंत त्यातही परिस्थिती आणखी नियंत्रणामध्ये होती. मात्र त्यानंतर रुग्ण दुप्पट होण्याचा वेग जो ४० दिवसांवर गेला होता, तो एकदम आठ दिवसांवर आला आणि रोज शेकडोंनी कोरोना पॉझिटिव्ह नागरिक येऊ लागले.जुलै महिन्याच्या १८ तारखेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा केवळ एका महिन्यात परिस्थिती झपाट्याने बदलल्याचे दिसून येते. या दिवशी जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २०९२ इतकी नोंदवण्यात आली. म्हणजेच केवळ एका महिन्यात १३६६ रुग्ण वाढले. त्यातील ९८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. म्हणजेच महिन्याभरात केवळ ३१६ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

जून महिन्यात ज्या तारखेला केवळ ५२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू होते, त्याच तारखेला जुलै महिन्यामध्ये १०१० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू होते. १८ जून रोजी केवळ आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता; तर १८ जुलै रोजी हाच आकडा ४६ वर पोहोचला. म्हणजे केवळ महिन्याभरामध्ये ३८ रुग्णांचा मृत्यू झाला.आता घरात उपचार करण्याची येणार वेळमुंबई, पुण्यामध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढतच असल्यामुळे अखेर ज्यांच्या घरामध्ये स्वतंत्र खोली आहे, अशा ठिकाणी घरातच उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कारण तेथे रुग्णांच्या वाढत्या प्रमाणामध्ये रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नाहीत. खासगी रुग्णालयांची बिले परवडणारी नाहीत. त्यामुळे ही संख्या अशीच वाढत राहिली तर कोल्हापुरातही हीच पद्धत अवलंबवावी लागणार आहे.हॉटेलमध्ये उपचार सुरूकोल्हापुरातही सध्या सीपीआर, डी. वाय. पाटील रुग्णालयांसह अनेक ठिकाणी खाटा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णाला हॉटेलमध्ये ठेवून तेथे ठरावीक रुग्णालयांच्या वतीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. अर्थात हॉटेल आणि रुग्णालय यांचा खर्च संबंधित रुग्णाला करावा लागणार आहे.आणखी ३५ ठिकाणी होणार उपचारवाढती रुग्णसंख्या आणि अपुऱ्या पडणाऱ्या खाटा यांचा विचार करता जिल्ह्यात आणखी ३५ ठिकाणी कोरोनाचे उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या उपाययोजनांचा व्हीसीच्या माध्यमातून आढावा घेतला. सध्या जिल्ह्यात १४ ठिकाणी असे उपचार सुरू असून आणखी ३५ ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारणीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणी ऑक्सिजनपासून सर्व ती यंत्रणा उभारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.गरम पाण्याची सोय हवीसीपीआर रुग्णालयासह काही ठिकाणी अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय नसल्याची तक्रार तेथे असणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांकडून करण्यात आली आहे. वास्तविक एकीकडे अंगात ताप, सर्दी, खोकला असेल आणि अशात जर अंघोळीसाठी गरम पाणी मिळणार नसेल तर हा आजार बळावण्याचीच शक्यता आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी गरम पाण्याची सोय नाही तेथे ती तातडीने उपलब्ध करून देण्याची गरज आहे.दहा दिवसांतील रुग्णसंख्यादिनांक    रुग्णसंख्या     मृत्यू

  • ११ जुलै      ४७           ०० 
  • १२ जुलै      ६४
  • १३ जुलै      ७१           ०४
  • १४ जुलै      ६९           ०७
  • १५ जुलै    १५५           ०४
  • १६ जुलै      ७७           ०५
  • १७ जुलै     २९३          ०३
  • १८ जुलै     २०५          ०३
  • १९ जुलै      १६६         ०९
  • २० जुलै      २१०        ०६
  • एकूण         १३५७      ४१
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर