शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Unlock : मंगल कार्यालयात विवाहास सशर्त परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 18:24 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील खुले लॉन, विनावातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात ५० लोकांच्या मर्यादेत विवाह करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी दिले. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेवर कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.

ठळक मुद्देमंगल कार्यालयात विवाहास सशर्त परवानगी : जिल्हाधिकारी५० जणांची उपस्थिती; नियम मोडल्यास फौजदारी

कोल्हापूर : जिल्ह्यातील खुले लॉन, विनावातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात ५० लोकांच्या मर्यादेत विवाह करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी दिले. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेवर कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.आपत्ती व्यवस्थापन खुले लॉन, विनावातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात ५० लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टन्सिंग तसेच कोरोनाच्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्नसमारंभ पार पाडण्यास नागरिकांकडून मागणी प्राप्त झाल्यास परवानगी देण्यात यावी, असे सूचित केलेले आहे.

त्यासाठी १) लग्नाच्या ठिकाणी प्रवेश करणाऱ्यांचे अनिवार्यतेने थर्मल स्कॅनिग करण्यात यावे. २) लग्नाच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तींने तीनपदरी मास्क किंवा साधा कापडी मास्क किंवा रुमाल बांधणे आवश्यक. ३) प्रवेशद्वार, बैठक कक्ष, भोजन कक्ष, बाथरूम, प्रसाधनगृह येथे हात धुण्याकरिताची साधने व पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर्स आवश्यक. ४) सामाजिक अंतराचा नियम काटेकोरपणे पाळण्यात यावा. ५) एक टक्का सोडियम हायपोक्लोराईड वापरून ठिकाण निर्जंतुकीकरण करण्यात यावे. ६) लग्नकार्यास उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे बंधनकारक राहील.परवानगीसाठी प्राधिकृत अधिकारी

  • कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्र : आयुक्त
  • संबंधित तालुके : तहसीलदार
  • नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत : मुख्याधिकारी
टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकkolhapurकोल्हापूर