शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

corona virus - ‘चायनीज पार्सल’ने पोस्टमन धोक्यात: बंदी असूनही एक दिवसाआड आवक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 14:46 IST

संपूर्ण जगाला ‘कोरोना’ देणाऱ्या चीनमधून एक दिवसाआड एक ‘चायनीज पार्सल’ पोस्टाच्या माध्यमातून कोल्हापुरात येत आहे. त्यामुळे हे पार्सल संबंधितांपर्यंत पोहोचविणाऱ्या पोस्टमनांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. ते जीव मुठीत घेऊनच हे काम करत आहेत. त्यावर बंदी घातली असतानाही ती येतातच कशी? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. पोस्ट विभागाने कोणतीही खबरदारी न घेतल्याने पोस्टमन यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. शनिवार (दि.२१)पर्यंत जवळपास ५० ‘चायनीज पार्सल’ आली आहेत.

ठळक मुद्दे‘चायनीज पार्सल’ने पोस्टमन धोक्यात: बंदी असूनही एक दिवसाआड आवक सुरूचजीव मुठीत घेऊन होतेय वाटप : आतापर्यंत सुमारे ५० पार्सल दाखल

प्रवीण देसाईकोल्हापूर : संपूर्ण जगाला ‘कोरोना’ देणाऱ्या चीनमधून एक दिवसाआड एक ‘चायनीज पार्सल’ पोस्टाच्या माध्यमातून कोल्हापुरात येत आहे. त्यामुळे हे पार्सल संबंधितांपर्यंत पोहोचविणाऱ्या पोस्टमनांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. ते जीव मुठीत घेऊनच हे काम करत आहेत. त्यावर बंदी घातली असतानाही ती येतातच कशी? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. पोस्ट विभागाने कोणतीही खबरदारी न घेतल्याने पोस्टमन यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. शनिवार (दि.२१)पर्यंत जवळपास ५० ‘चायनीज पार्सल’ आली आहेत.कोरोना रोगाने जगभर हाहाकार माजविला आहे. हजारो लोकांचे बळी या संसर्गजन्य रोगाने घेतले आहेत. संपूर्ण जग यामुळे भीतीच्या छायेखाली आहे. केंद्र व राज्य सरकार या रोगाच्या प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना करत आहे. एकाबाजूला या रोगाविरोधात दोन हात करण्यात पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून प्रशासकीय अधिकारी गुंतले आहेत.

गावपातळीपासून जिल्हापातळीपर्यंत सूक्ष्म नियोजन केले जात आहे; परंतु सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे ज्या देशाने संपूर्ण जगाला हा ‘कोरोना’ दिला, त्या चीनमधील वस्तूंचे पार्सल बिनदिक्कत देशात दाखल होत आहेत. दिल्ली, मुंबईमार्गे पोस्टाच्या माध्यमातून गेल्या महिन्याभरापासून शनिवारी (दि.२१)पर्यंत ५० पार्सल कोल्हापुरात आली आहेत. त्यातील बहुतांश पार्सलचे वितरण पोस्टमन यांनी संबंधितांच्या पत्त्यावर जाऊन केले आहे.

हे करताना कोणतीही खबरदारी पोस्ट विभागाने घेतलेली दिसत नाही. इतका भयंकर रोग ज्या देशातून आला, तेथील वस्तू थेट कोल्हापुरात येत आहे. हे समजत असूनही पोस्ट प्रशासन त्याकडे कानाडोळा करून पोस्टमन व कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालत आहे, ही बाब गंभीर आहे.सर्वाधिक पार्सल शहरातीलशहरात रमणमळा, शिवाजी पेठ, शनिवार पेठ, रेल्वे स्टेशन आदी कार्यालयांमध्ये चायनीज वस्तूंची पार्सल येत आहेत. नोकरीनिमित्त चीनमध्ये असलेल्या व्यक्तींकडून आपल्या कुटुंबियांना काहीतरी वस्तू या पार्सलमधून पाठविल्या जात असल्याचे चित्र आहे. या पार्सलचे सर्वाधिक प्रमाण हे शहरातील असल्याचे सांगण्यात आले.

सॅनिटायझर लावा आणि वाटाचायनीज पार्सल हे दिल्ली, मुंबई येथून कोल्हापुरात येत आहे. त्याचा स्पर्श अनेकजणांना झालेला असतो. त्याबाबत कोणतीही खबरदारी पोस्ट विभागाकडून घेतली जात नाही. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविल्यावर ही पार्सल पूर्वीची असतील त्यामुळे सॅनिटायझर लावून त्याचे वाटप करा, अशी बालिश उत्तरे त्यांच्याकडून दिली जात आहेत. एकंदरीत या पार्सलच्या माध्यमातून एकप्रकारे बॉम्बच येत असूनही पोस्ट प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे यावरून दिसत आहे.

सध्या सर्व पार्सल वाटप बंद करण्यात आली आहेत.शहरात चार ठिकाणी व तालुक्याच्या काही ठिकाणी पत्र वाटप सुरू आहे.-ईश्वर पाटील,प्रवर अधीक्षक कोल्हापूर पोस्ट आॅफिस 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPost Officeपोस्ट ऑफिसkolhapurकोल्हापूर